24.4 C
Ratnagiri
Wednesday, November 13, 2024

हरचिरी-उमरेत पकडली ७६ वानर-माकडे , आंबा बागायतदारांना दिलासा

गेल्या महिन्यात सुमारे ७० वानर माकडे पकडण्यात...

चिपळूणचे मटण, मच्छीमार्केट १८ वर्षे बंद

चिपळूण शहरातील मटण आणि मच्छीविक्रीचा प्रश्न गंभीर...

कोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीजनिर्मिती

कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी...
HomeMaharashtraराज्यातील शाळांबद्द्ल ४-५ दिवसांत निर्णय – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

राज्यातील शाळांबद्द्ल ४-५ दिवसांत निर्णय – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

महाराष्ट्रात मुंबई भिवंडीनंतर, पुणे, पिंपरी चिंचवड येथे नव्या व्हेरीयंट ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णसंख्या आता आठवर पोहोचली आहे. देशाची राजधानी दिल्लीतही रुग्ण आढळला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध पुन्हा एकदा कठोर केले जाणार आहेत.

एक डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या पहिली ते पाचवी च्या शाळा सुरु होण्यासाठी अनेक अडचणी समोर येत आहेत. त्यामुळे शाळा पुन्हा सुरु करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर निरीक्षण करून घेतला जाईल, असे मत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

ओमिक्रॉनच्या  पार्श्वभूमीवर आढावा घेऊन शाळांबाबत ४ ते ५ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. लहान मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या लसीकरणाला सुरूवात व्हावी अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या १५ डिसेंबरपासून मुंबई, पुणेसारख्या मेट्रो सिटीमध्ये पुन्हा शाळेची घंटा वाजणार का ? याबाबत शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम मनस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक ग्रामीण भागांमध्ये शाळा कोरोना नियमावलीचे पालन करून सुरु देखील करण्यात आल्या आहेत. शहरी भागामध्ये अजून अधिक प्रमाणात शाळा सुरु झालेल्या नाहीत. मुंबई, पुण्यात १५ डिसेंबर पासून टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवण्यात आली आहे. अद्याप लहान मुलांच्या करण्यात येणाऱ्या लसीकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती शालेय शिक्षण विभागाला प्राप्त झालेली नाही. मात्र, लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षा ही प्रथम महत्वाची आहे. त्यामुळे लवकरात लवकर लहान मुलांचे लसीकरण सुरु व्हावे अशी आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.

कोविड टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोससाठी केंद्राकडे आग्रही मागणी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. याशिवाय सध्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, जिथे गर्दी होईल अशी ठिकाण, जसे राजकीय बैठका, विविध मेळाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे देखील आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे.

काही प्रमाणात नव्या व्हेरीयंटचे रुग्ण सापडल्याने, राज्यात लगेचच कडक निर्बंध लावणे लोकांसाठी कठीण होईल, त्यामुळे साधारण परिस्थितीचा अंदाज घेऊन व त्यावर लक्ष ठेवून, टास्क फोर्स, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि केंद्रसरकारशी चर्चा करुनच आवश्यकतेनुसार लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular