30.6 C
Ratnagiri
Sunday, April 14, 2024

अजय देवगणने ‘मैदान’मध्ये केला अप्रतिम अभिनय

2019 मध्ये अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाची...

सिडकोला कोकणातून हद्दपार करणारच, खा. राऊतांचा निर्धार

गुजरातच्या उद्योगपतींना कोकण किनारपट्टी विकण्याचा कुटील डाव...

डिझेल विक्री बंद ठेवल्याने मच्छीमार संस्थांचा तोटा

पेट्रोलपंपावरून ९ येणाऱ्या टँकरद्वारे मिरकरवाडा बंदरावर अनधिकृतपणे...
HomeMaharashtraमहिला वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

दीपाली चव्हाण यांनी आपल्या चार पानांच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहले आहे कि, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच एकमेव माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार असतील, त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अपर मुख्य प्रधान वन सरंक्षक रेड्डी यांच्या विरुद्धदेखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व या प्रकरणाचा तपास करण्यास अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून काढून घेऊन अन्य निष्पक्ष अधिकाऱ्याकडे सुपूर्द करावा, अशी मागणी केली आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या ४ पाणी सुसाईड पत्रामुळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे शिवकुमार यांच्या बद्दल अनेक गोष्टी उघड झाल्या आणि डीएफओ शिवकुमार हे एकटेचं या प्रकरणात जबाबदार नसून, दीपालीने बर्याचदा केलेल्या  तक्रारीची दखल न घेता शिवकुमार यांना कायम पाठीशी घालणारे वरिष्ठ रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाही सेवेतून निलंबित करीत अटक करण्याची मागणीसाठी तग धरून आहेत. परंतु, सरकारनं रेड्डी यांची बदली करून त्यांना एकप्रकारे अभयच दिलं आहे. या व्यवस्थेनं दीपाली चव्हाण यांची हत्या केली आहे.

dipali chavan suicide

आता पोलीस यंत्रणेकडून हरतर्हेने शिवकुमार यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातील. तीन दिवसाची देण्यात आलेली पोलिस कोठडी संपल्यावर शिवकुमार यांच्या जामीनासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. त्यामुळं या प्रकरणामध्ये शिवकुमार यांच्यासोबत त्यांना कायम पाठीशी घालून एक प्रकारे चुकीच्या गोष्टीना समर्थन देणाऱ्या रेड्डी यांच्यावरही कलम ३०२ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी,  अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा यांच्याशी दीपाली चव्हाण यांनी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेत रेड्डी यांच्याशी संपर्क करून, शिवकुमार यांच्या बद्दलच्या दीपाली यांच्या तक्रारी सांगितल्या, तसेच वनमंत्री संजय राठोड नवनीत राणा यांनी या संदर्भात यांना पत्र पाठवून सर्व परिस्थिती कळवली होती. परंतु, राणा यांनी केलेल्या तक्रारीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप वाघ यांनी केला आहे. अमरावतीचे पोलीस अधीक्षक आणि शिवकुमार यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध पाहता, हा तपास अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांकडून काढून घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

forest officer rupali chavan suicide case

दीपाली चव्हाण यांनी आपल्या चार पानांच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहले आहे कि, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच एकमेव माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार असतील, त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी. माझ्यासोबत जे घडले ते इतर कोणत्याचं महिला कर्मचाऱ्यासोबत घडू नये असे आत्महत्या केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्त्येपूर्वी केलेल्या ४ पानी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे कि, वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी वारंवार दिलेल्या प्रचंड त्रासामुळे आपण आत्महत्या करत आहोत. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याबाबत सविस्तर लिहून ठेवल आहे.

डिंक तस्कर रेल्वे गाडीत बसून पळून जात असताना दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना गजाआड करणाऱ्या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्‍या २८ वर्षाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत: छातीवर गोळ्या घालून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवार संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय निवासामध्ये दिपाली चव्हाणचा मृतदेह आढळल्याने सर्व महाराष्ट्र हादरला. दिपाली यांनी त्यांच्याजवळील शासकीय बंदुकीमधील गोळ्या स्वतःच्या छातीवर झाडून आत्महत्या केली, अशी माहिती मिळाली आहे. तसेच त्या गर्भवती असल्याचीही माहिती रिपोर्टमध्ये समोर आली आहे. स्वभावाने कायम हसतमुख असणाऱ्या आणि आधुनिक विचारांच्या असणाऱ्या दिपाली या आत्महत्या करुच शकत नाही, असा अंदाज तिच्या निकटवर्तीयानी केला आहे. दिपाली यांनी त्यांच्या कारकिर्दीत धुळघाट रेल्वे येथे असताना सालई डिंक तस्करांना दूरवर पाठलाग करून जेरीस आणले होते. हरिसाल येथील या तीन गावांच्या मालुर, रोरा, आणि मांग्या पुनर्वसनासाठी त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. दिपाली यांनी प्रा.आ. केंद्रात सोमवारीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार पटेल तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली, या आत्महत्येप्रकरणी राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular