मागील आठवड्यापासून सुएझच्या कालव्यात अडकलेल्या एव्हरगिव्हन या मालवाहू जहाजाची अखेर सुटका झाली असल्याने सुएझ कालव्यातून होणारी वाहतूक आता पुन्हा सुरु करण्यात आली आहे. एव्हरगिव्हन जहाजाची सुटका करण्यासाठी विविध स्तरांतून प्रयत्न केले जात होते. सुएझ कालव्यामध्ये झालेल्या आशिया आणि युरोपीय खंडांना जोडणाऱ्या इजिप्तस्थित जहाजांच्या वाहतूक कोंडीमुळे साऱ्या जगाचे लक्ष तेथेच केंद्रित झाले आहे.
इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकलेल्या ४०० मीटर लांबीच्या मालवाहू जहाजामुळे जगभरात दररोज सुमारे ७३ हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. वाऱ्याच्या वेगामुळे भरकटलेल्या या जहाजाला बाहेर काढण्यासाठी मोठमोठी यंत्रणा कमी लागली आहेत. तसेच जहाजाची दिशा बदलण्यासाठी कदाचित यातील माल उतरवल जाईल असे आसपासच्या किनार्यावरील लोकांना आशा लागून राहिलेली. ते जहाज पाहण्यासाठी किनाऱ्यावरील गाव मँशेट रुगोला गावातील लोकांनी एकच गर्दी केली होती. ५ हजार लोकसंख्य असलेल्या या गावातील लोकांना जहाजातील सामान उतरवले तर आपल्याला मिळण्याची शक्यता आहे, म्हणून किनाऱ्यावर गर्दी वाढतच होती. जहाजावर भरलेल्या सामनामध्ये काही ना काही घरगुती वापरातील फ्रिज, एसी, पंखे, टीव्ही, वॉशिंग मशीन इत्यादी इलेक्ट्रिक सामान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जहाजाची दिशा वळविणे दिवसेंदिवस कठीण बनले असल्याने ते रिकामे करण्यासाठी त्यामधील सामान किनाऱ्यावर उतरविले जाईल व तिथेच सोडून देण्यात येईल व आपल्याला हे सामान फुकट मिळेल असे गावकऱ्यांना वाटत होते. ६५ वर्षीय उम्म गाफर रोज जहाजाच्या जवळ जाऊन येतात, काही तास आशेने त्या जहाजाचे निरीक्षण करत असतात. त्या म्हणतात कि, आजपर्यंत एवढी मोठे यंत्र येथे पोहोचलेले नव्हते, म्हणूनमी ते पाहायला आले. जहाज बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. कारण, कालव्याच्या दोन्ही बाजूने ३२० हून अधिक मनसे जहाज बाहेर येण्याची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. सलग सहा दिवसांपासून त्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहेत. सहाव्या दिवसपर्यंत फक्त दोन इंचापर्यंतचं जहाजाची हालचाल घडवणे शक्य होऊ शकले होते. जहाजाची मालक कंपनी शोइ किसेन ही आहे. तसेच जर जहाजाला बाहेर काढण्यामध्ये अडथळे येत असल्यास जहाज पूर्ण रिकामे करून त्यामधील वस्तूंना हटवण्याचा विचार कंपनी करेल असे सांगण्यात आले.
युरोपीय आणि आशियायी देशांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा समजला जाणारा इजिप्तमधील सुएज कालवा गेल्या सहा दिवसांपासून एका अडकलेल्या कार्गो जहाजामुळे पूर्णत: ब्लॉक झाला आहे. समुद्रामध्ये वेगाने सुटलेल्या समुद्री वाऱ्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या एका मोठ्या कार्गो शीपची दिशा बदलली गेली आणि ते या चिंचोळ्या कालव्यामध्ये अडकून पडलं. त्यामुळे या समुद्र मार्गेने होणारी वाहतूक गेले सहा दिवस स्थगित झाली असून जगाचे दर तासाला तब्बल 2800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते आहे. या अडकलेल्या एव्हरग्रीन जहाजावरील सर्व क्रू भारतीय आहे. इजिप्तचा सुएज कालव्यामधून जरी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असली तरी समद्रातील त्याच क्षेत्रफळ पाहता 193.3 किमी इतकाच एक चिंचोळा मार्ग आहे. पूर्वीच्या काळी सुएझ कालव्यावर सत्ता गाजवण्यासाठी अनेक युध्दं पुकारली गेली आहेत.
सुएज कालवा सध्याच्या स्थितीला इजिप्तच्या ताब्यामध्ये आहे. सुएज कालवा आशियाला खंडाला युरोपशी जोडण्याचं काम करतो म्हणजेच भूमध्य समुद्रात लाल समुद्राशी तसेच अटलांटिक महासागरात पॅसिफिक महासागराशी जोडला जातो. मंगळवारी सकाळी 7.40 च्या सुमारास, चीनमधून माल भरुन एक एव्हरग्रीन जहाज नेदरलॅन्डकडे रवाना होताना या कालव्यामध्ये अडकलं. समुद्री वाऱ्याच्या जोराच्या प्रवाहांने या जहाजाचे तोंड विरुद्ध दिशेला गेलं त्यामुळे चालकाचं जहाजावरचं नियंत्रण सुटून ते 400 मीटर लांबीचं आणि 59 मीटर रुंदीचं जहाज या कालव्यात अडकले. त्यामुळे हा संपूर्ण समुद्री मार्ग ६ दिवसांसाठी ब्लॉक होऊन समुद्रात जहाजांचं ट्रॅफिक जाम झाल्याचं निदर्शनास आले. बुधवारी हे फसलेलं जहाज बाजूला करण्यासाठी इजिप्त प्रशासनाकडून कालव्यात प्रयत्न करण्यात आले.
अडकलेले जहाज हे महाकाय असल्याने त्यासाठी आठ टगबोट्सचाही वापर केल गेला परंतु, त्याचा काही उपयोग झालेला दिसून आला नाही. या समुद्री मार्गाने जवळपास १०० मोठ्या तर अनेक लहान जहाजांची वाहतूक नियमित सुरु असते. सुएज कालव्यामध्ये महाकाय जहाज अशा प्रकारे अडकल्याने जगाची अर्थव्यवस्था डगमगली. एका जपानी व्यक्तीच्या मालकीचे हे जहाज आहे. त्याने शनिवार संपेपर्यंत जहाजाची सुटका होऊन समुद्री मार्ग वाहतुकीसाठी मोकळा होण्याचा अंदाज वर्तविला होता. या सहा दिवसामध्ये जवळजवळ 400 जहाज समुद्रात थोड्या थोड्या अंतरावर उभी केली गेली होतीत. हा कालवा पूर्णत: बंदच झाल्याने रोज होणारी जवळपास 9.7 बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक ठप्प झाली. त्यामधील पश्चिमी देशांचे 5.1 बिलियन डॉलर्सची वाहतूक असून पूर्वेकडच्या देशांची 4.6 बिलियन डॉलर्सची वाहतूक असते. या हा समुद्री मार्ग जर मोठ्या काळासाठी बंद राहिला तर या जहाजांना आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोप ते आशिया असा प्रवास करावा लागेल आणि ते आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही.