27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeChiplunसध्या दोन्ही नेत्यांनी हातात हात घालून काम करावे – विनायक राऊत

सध्या दोन्ही नेत्यांनी हातात हात घालून काम करावे – विनायक राऊत

बैठकीत चव्हाण यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. आपले राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी पक्षातीलच काहीजण प्रयत्नशील असल्याचे सांगत आता वेगळा निर्णय घ्यावाच लागेल

चिपळूण दौर्‍यावर आलेल्या खा. राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधत आमदार भास्करशेठ जाधव अथवा सदानंद चव्हाण या दोघांपैकी कुणाकडेही चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व अद्याप दिलेले नाही. ज्यांना जबाबदारी हवी असेल त्यांनी मातोश्रीवर येवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करावी, पक्षप्रमुख त्याबाबत विचार करतील, असे सांगत दोन्ही नेत्यांनी हातात हात घालून काम करावे, असा सल्ला खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

शिवसेनेत नाराज असलेल्या माजी आमदार सदानंद चव्हाण समर्थकांची बैठक मंगळवारी सकाळी झाली. या बैठकीत चव्हाण यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. आपले राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी पक्षातीलच काहीजण प्रयत्नशील असल्याचे सांगत आता वेगळा निर्णय घ्यावाच लागेल, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या भूमिकेला शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला. चव्हाण समर्थकांची बैठक आटोपताच खासदार विनायक राऊत चिपळुणात दाखल झाले. त्यामुळे चव्हाण यांच्यासह कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊतांची भेट घेत त्यांच्या समोरही नाराजी व्यक्त केली.

नव्याने स्थापन झालेले सरकार काही दिवसांचेच आहे. न्यायालयीन लढाई आम्ही जिंकू, असा विश्‍वासही खा. राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याला सामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान शासकीय विश्रामगृहावर खासदार विनायक राऊत यांनी पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत चिपळूणचे नेतृत्व आणि माजी आमदार चव्हाणांवरील अन्यायाबाबत प्रश्‍न उपस्थित केले गेले. मात्र यावर खासदारांकडून उत्तरच मिळाले नाही. यानंतर राऊत यांनी चव्हाण यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा केली.

RELATED ARTICLES

Most Popular