24 C
Ratnagiri
Tuesday, February 24, 2026

लांजातील चार गावांना वादळी पावसाचा तडाखा

महाशिवरात्रीनंतर थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाली...

कोकणात १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन शिमगोत्सव, होळीसाठी ‘लालपरी’ सज्ज

मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना...

रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार ९.५ कोटींची ‘स्किल लॅब’

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भावी...
HomeRatnagiriऑक्टेल कंपनीचे काम कामगारांनी पाडले बंद अखेर १५ कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय

ऑक्टेल कंपनीचे काम कामगारांनी पाडले बंद अखेर १५ कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय

संचालक, व्यवस्थापन दाद देत नसल्याने कंपनीतील कामच थांबवण्यात आले.

ऑक्टेल कंपनीच्या १५ कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी संचालकांनी अमान्य केल्यामुळे गुरुवारी कंपनीतील सर्व कामगार एकवटले. त्यांच्यासाठी मिरजोळे ग्रामस्थांनीही कंपनीकडे धाव घेतली. संचालक, व्यवस्थापन दाद देत नसल्याने कंपनीतील कामच थांबवण्यात आले. यामुळे मोठा पेच निर्माण झाला. राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला. त्यांनी कंपनीचे मालक राजीव टंडन यांच्याशी संवाद साधला. अखेर ३१ डिसेंबर पूर्वी या कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कंपनीचे थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरीतील ऑक्टेल कंपनीत गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी २०२४ ते २८ या ४ वर्षांसाठी कामगार युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात करारा संदर्भात बैठक पार पडली. याच दरम्यान १५ कंत्राटी कामगारांना कायम करावे, अशी मागणी युनियनच्या माध्यमातून करण्यात आली. व्यवस्थापनाने नकारात्मक भूमिका घेतली. यावर युनियनने कंपनीचे मालक राजीव टंडन यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली मात्र ती चर्चाही निष्फळ ठरली.

पुढच्या वेळी या कंत्राटी कामगारांचा विचार करू, असे मालकांनी सांगितले मात्र युनियन आपल्या मताशी ठाम राहिली. व्यवस्थापन दाद देत नसल्याने हा विषय चिघळला. बहुतांश कंत्राटी कामगार मिरजोळे गाव व परिसरातील राहणारे होते. त्यांच्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने कंपनीवर दाखल झाले. कायमस्वरूपी असलेल्या काम गारांनीही त्यांना साथ दिली. यामुळे ऑक्टेल कंपनीचे कामकाजच बंद पडले. हा विषय राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला. त्यानी थेट कंपनीचे मालक राजीव टंडन यांच्याशी संवाद साधला. अखेर राजीव टंडन यांनी ३१ डिसेंबर पूर्वी या कंत्राटी कामगारांनी कायम करू असे, त्यांना सांगितले. ना सामंत यांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांनी ऑक्टेल कंपनीत जाऊन व्यवस्थापनाशी संपर्क साधला. ना. सामंत आणि मालक राजीव टंडन यांच्यात झालेल्या चर्चेनुसार घेतलेल्या निर्णयांची माहिती बाबू म्हाप यांनी कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर कामगारांचे आंदोलन थांबवण्यात आले आणि कंपनीचे कामकाज पुन्हा सुरू झाले, असे बाबू म्हाप यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular