उत्तर बांगलादेशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसाम, मेघालय, त्रिपुरा या राज्यांमध्ये जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. २४ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या दरम्याल गुजरात आणि महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यापार्श्वभुम ीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला २४ वे २६ ऑगस्ट दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तासात पश्चिम बंगालच्या पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कर्नाटक-गोवा किनारपट्टीलगत पूर्व मध्य अरबी समुद्रात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पूढील २४ तासात ते उत्तरेतकडे सरकण्याची शक्यता आहे.
यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळले. विशेषतः कोकणात ७ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस कोसळेल. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचे २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याला देखील २४ आणि २५ ऑगस्टला ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.