लांजा येथे ११ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्म ठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आशितोष अनिल जाधव (२०, ग़ लांजा) असे आरोपीचे नाव आहे. १५ जुलै २०२३ रोजी लांजा येथे अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती याप्रकरणी लांजा पोलिसांकडून आशितोष याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून अॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पिडीता ही शाळेतून सुटल्यानंतर घरी चालत जात होती. यावेळी तिच्यासोबत शाळेतील दोघ मुलं होती.
यावेळी आरोपी आशितोष हा पिडितेजवळ आला. त्याने तिच्यासोबत असलेल्या दोन्ही मुलांना धमकावून वेगळ्या रस्त्याने घरी जाण्यास सांगितले. त्यानुसार घाबरलेली दोन्ही मुले वेगळ्या रस्त्याने घरी जाण्यास निघाली. पिडीता ही एकटीच राहिली असल्याचे पाहून आरोपी याने पिडितेचा जबरदस्तीने हात पकडला तसेच जवळच असलेल्या एका शासकीय उपकेंद्राच्या मागील बाजुला ओढत घेवून गेला. या ठिकाणी आरोपी याने पिडितेवर अत्याचार केला. तसेच घडला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. घरी परतल्यानंतर पिडिता ही घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले, नातेवाईकांनी पिडीतेला धीर देत चौकशी केली असता तिने घडलेली घठना नातेवाईकांसमोर उघडे केली अशी सारी हकीकत पिडीतेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आली होती.
संरक्षण या प्रकरणी पिडितेच्या आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (ए) (बी), ५०४,५०६ तसेच बालकांचे लैगिक अपराधांपासून अधिनियम २०१२ चे कलम ४,६, ८,९ (एम), १० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास तात्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक पी. व्ही. देशमुख यांनी केला. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केले. तसेच खटल्यादरम्यान सरकार पक्षाकडून एकूण ११ साक्षीदार तपासण्यात असलेल्या एक शाळकरी मुलाची देखील साक्ष नोंदविण्यात आली. खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाशी शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयापुढे पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल राजेश शिंदे यांनी काम पाहिले.

