31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर...

लांज्यातील तरुणाची कर्तबगारी! मुंबईपासून ते सोलापूरपर्यंत, पोलिस विलक्षण थक्क

जीवनसाथी अॅपवर पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवून तरुणाने...

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...
HomeRatnagiriमालगुंडमधील प्राणीसंग्रहालयाचे काम वेगाने, अनेक प्राणी पाहता येणार

मालगुंडमधील प्राणीसंग्रहालयाचे काम वेगाने, अनेक प्राणी पाहता येणार

पालकमंत्री ना. उदय सामंत यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

४ बेंगॉल वाघ आणि १७५० चौ. मी. क्षेत्रफळ, हिप्पोपोर्टमस (पाणघोडे) २ प्राणी आणि १७७० चौ. मी. यांच्यासह भारतीय कैनिडी, माकडे, निशाचर प्राणी, सरपटणारे, गोड्या पाण्यातील मासे तसेच विविध परदेशी प्रजातीचा समावेश असलेल्या मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाच्या कंपाऊंडचे काम पूर्ण झाले आहे. पावसानंतर कामाला वेग येणार आहे. या प्रकल्पाचे पुढील २० वर्षांसाठी (२०२२-४४) विकासदिशा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक १० वर्षांनी पुनरावलोकन केले जाईल, असे प्रकल्प अहवालात म्हटले आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. जिल्हा परिषद व वनविभागामार्फत हे काम होणार आहे. एमआयडीसीकडून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड दबाव निर्माण झाला असून, अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. भारत सरकारने या स्थितीची देखल घेत राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये आणि प्राणीसंग्रहालये स्थापन करून वन्यजीव

…५१ कोटींचे अंदाजपत्रक – प्रस्तावित प्राणीसंग्रहालय आणि बचावकेंद्रासाठी सुमारे ५१ कोटी ६ लाख ८० हजार एकूण अंदाजित खर्च आहे. या खर्चामध्ये प्राणीनिवास, पायाभूत सुविधा, विद्युत आणि पाणीव्यवस्था, सुरक्षा, कर्मचारी निवास, पशुवैद्यकीय सुविधा, शिक्षण व जागृती केंद्र, बागबगीचा, वाहने, देखभाल व इतर घटक समाविष्ट आहेत. संवर्धनासाठी पावले उचलली. महाराष्ट्र हे वनस्पती व प्राणी संवर्धनाच्या राष्ट्रीय चळवळीचे अग्रणी राज्य आहे. राज्य सरकारने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत इन-सीटू आणि एक्स-सीटू संवर्धन क्षेत्रांचे जाळे तयार केले. इन-सीटू संवर्धनामुळे प्रजाती त्यांच्या मूळ परिसंस्थेत भरभराटीला येतात तर एक्स-सीटू संवर्धनामुळे नियंत्रित परिस्थितीत धोक्यात असलेल्या प्रजातींचे संरक्षण होते.

२६ जानेवारी २०२२ला ग्रामपंचायत म ालगुंडच्या ग्रामसभेने ठराव करून प्राणीसंग्रहालय स्थापन करण्यास सहमती दर्शवली. ५० एकर खासगी जमीन देण्याचे निश्चित केले. त्यानंतर शेतकऱ्यांची संमती, टोटल स्टेशन सव्र्व्हे, ‘ लेवल सर्व्हे आणि हद्दीचा निर्धार तहसील कार्यालयाकडून करण्यात आला. रत्नागिरी ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन व तीर्थयात्रेच्या नकाशावरील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. समुद्रकिनारी असलेली विविध सुंदर किनारे रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालतात.

प्रस्तावित प्राणीसंग्रहालय मालगुंड गावात वसलेले असून, ते गणपतीपुळे या प्रसिद्ध पर्यटनस्थळापासून फक्त ६ किमी अंतरावर अशी असणार प्राण्यांच्या प्रजातिची निवड १. स्थानिक परिसंस्थेतील प्रजाती – ६० टक्के २. प्रादेशिक प्रजाती – २० टक्के ३. राष्ट्रीय प्रजाती – १० टक्के ४. परदेशी प्रजाती – १० टक्के आहे. प्रस्तावित प्राणीसंग्रहालयाचा विस्तार १५.४९ हेक्टर (सुमारे ३८ एकर) खासगी जमीन आहे. मालगुंड परिसरात जल, वायू वा ध्वनी प्रदूषण नाही. प्राणी संग्रहालय सुरू झाल्यावर प्राण्यांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून प्राण्यांचे निवासस्थान रस्त्यापासून दूर प्रस्तावित केले आहे. प्राणी स्वयंपाकघर, चारा साठवण, पशुवैद्यकीय दवाखाना, पुनर्वसन केंद्र विलगीकरण कक्ष, इन्सिनरेटर आदी सुविधा असणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular