आयुष्यमान आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आजतागायत संपूर्ण देशात २५ कोटी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातही ५ लाख ५ हजार ३९७ पात्र लाभार्थी असून, त्यापैकी १ लाख ४३ हजार ८८५ लाभार्थ्यांना कार्ड वाटप झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या कार्डसाठी लवकारात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड आशावर्कर, खासगी कॉमन सर्व्हिस सेंटर वा ग्रामपातळीवरील केंद्रचालक, आपले सरकार केंद्र, स्वतः लाभार्थी कार्ड काढण्यासाठी रेशनकार्ड व त्याचबरोबर १२ अंकी ऑनलाईन रेशनकार्ड नंबर, आधार कार्ड व आधार कार्डाला लिंक असलेला मोबाईल नंबर, स्वतः लाभार्थी, नवीन लग्न झाल्याचे नाव, नवीन जन्म झालेल्या शिशूचे नाव घालण्यासाठी अपडेट रेशनकार्ड, विवाह प्रमाणपत्र, प्रधानमंत्री लेटर, जन्म प्रमाणपत्राप्रमाणे कुटुंब यादी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.