25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiri'आरजीपीपीएल'मधून १३०० मेगावॅट वीजनिर्मिती…

‘आरजीपीपीएल’मधून १३०० मेगावॅट वीजनिर्मिती…

गॅसवर चालणारा हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.

गॅसच्या वाढलेल्या किमती आणि विजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीजप्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता; परंतु, राज्य किंवा केंद्र सरकारकडून अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, येथील प्रकल्प व्यवस्थापन विजेच्या मागणीनुसार वीजनिर्मिती करत आहे. गेले काही दिवस प्रकल्पातून दोन टप्प्यात १३०० आणि ४०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे; मात्र स्थानिक कामगार कपात सुरूच आहे. तालुक्यातील अंजनवेल या ठिकाणी उभारण्यात आलेला एन्रॉनचा दाभोळ वीजप्रकल्प आणि आताचा रत्नागिरी गॅस आणि वीजप्रकल्प १९९५ ला सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या काळात वादग्रस्त ठरला होता.

सध्या एनटीपीसी या कंपनीतील प्रमुख भागधारक आहे तर राज्य वीज कंपनीचे भागभांडवल खूपच कमी आहे. गॅसवर चालणारा हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. किफायतशीर दराने अखंडित गॅस पुरवठा झाल्यास या प्रकल्पातून कमी दराने वीजनिर्मिती होऊ शकते. त्यासाठीच केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. एकीकडे विजेची वाढती मागणी आणि दुसरीकडे कोळशाचा तुटवडा लक्षात घेता नैसर्गिक वायूवरील हा प्रकल्प सुरू ठेवणे गरजेचे आहे. गतवर्षी केंद्र सरकारने हा प्रकल्प टिकला पाहिजे म्हणून केंद्रीय ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेतली; मात्र, कार्यवाही झालेली दिसली नाही.

रेल्वेबरोबरचा करारही संपुष्टात – वीज दरवाढीमुळे तत्कालीन फडणवीस सरकारने प्रकल्पातून वीज घेणे बंद केले होते. कंपनीने रेल्वेबरोबर ५०० मेगावॅटचा करार करून प्रकल्प सुरू ठेवला. सरकारने नैसर्गिक वायूवरील अनुदान बंद केल्याने वीजनिर्मिती महागडी झाली. परिणामी, रेल्वेबरोबरचा करारही संपुष्टात आला.

RELATED ARTICLES

Most Popular