गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबई, पुणेस्थित चाकरमान्यांनी गौरी गणपती विसर्जनानंतर परतीची वाट धरण्यासाठी आतापासूनच तयारी केली आहे. यासाठी येथील एसटी आगाराच्या १४० गाड्या बुकींग केल्या आहेत.. या गाड्यांमध्ये ग्रुप बुकींग गाड्यांचीही आणखी भर पडणार असल्याची माहिती आगारप्रमुख दीपक चव्हाण यांनी दिली. पुढील महिन्यात १९ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे. लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी चाकरम नी रेल्वे, एसटी बसेस, खासगी वाहतूक व स्वतःच्या वाहनातून लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होणार नाहेत. यंदा राज्य शासनाने एसटी वास भाड्यात महिला ज्येष्ठ नागरिक व ७५ वर्षांवरील वृद्धांना सवलत दिल्याने एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होणार आहे.
चाकरमान्यांच्या सुखरूप व सुरक्षित प्रवासासाठी येथील एसटी आगारही सज्ज झाले आहे. एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल विभागातील गाड्यांसह येथील आगाराच्या लांब पल्ल्याच्या २६ नियमित गाड्या चाकरमान्यांना गावी घेऊन येणार आहेत. यामध्ये ११ खासगी बसेससह ४ शिवशाही ३ स्लीपर व साध्या गाड्यांचा समावेश आहे. तर परतीसाठी चाकरमान्यांनी २८ ऑगस्टपर्यंत आगारातील १४० गाड्यांची बुकींग केली आहे. गौरी- गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर लगेचच चाकरमानी परतीची वाट धरणार असून बुकींग केलेल्या गाड्यांपैकी २० गाड्या २३ सप्टेंबर रोजी, १०० गाड्या २४ रोजी तर २० गाड्या २५ रोजी रवाना होणार आहेत.
मुंबई, नालासोपारा, भांडुप, ठाणे, कल्याण, पुणे आदी मार्गांवर बुकींग केलेल्या बसेस धावणार आहेत. गतवर्षी १५८ गाड्यांची बुकींग झाल्या होत्या. यंदा हा आकडा वाढणार असून बुर्कीगमध्ये अजून ग्रुप बुकींग गाड्यांची भर पडणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात बुकींग गाड्यांमध्येदेखील शासनाच्या सर्व योजनांच्या सवलती दिल्या जाणार. आहेत. सणासुदीत गाड्यांच्या सुस्थितीवर भर दिला जात असून चाकरमान्यांना चांगली सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे आगारप्रमुख चव्हाण यांनी सांगितले.