26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeChiplunचिपळुणातील १९ होर्डिंगधारकांना नोटिसा, पालिका प्रशासन आक्रमक

चिपळुणातील १९ होर्डिंगधारकांना नोटिसा, पालिका प्रशासन आक्रमक

शहरात काही मोक्याच्या ठिकाणी मोठमोठे होर्डिंग उभे आहेत.

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनधिकृत तसेच धोकादायक होर्डिंगचा शोध घेतला जात आहेत. येथील पालिकेने मोहीम हाती घेतली आहे. शहरातील १९ होर्डिंगधारकांना नोटीस बजावून दोन दिवसात फलक हटवण्याचे आदेश दिले आहेत. संबंधितांना होर्डिंग न काढल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता सुरू असल्याने त्या आधीच शहरातील राजकीय फलक हटवण्यात आले. शेकडो फलक पालिकेने जप्त केले असून, त्या विषयी अजूनही कारवाई सुरूच आहे. अशातच घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू व ७० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची घटना घडली.

या घटनेनंतर होर्डिंग हटविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींनाही याबाबतचे आदेश दिले आहेत. चिपळूण पालिकेने तत्काळ या विषयीची कारवाई सुरू केली. त्यानुसार शहरातील चिंचनाका, भोंगाळे, मार्कडी मेहता पेट्रोलपंप, प्रभातरोड, बहादूरशेखनाका, पॉवरहाऊस, बाजारपूल, बाजारपेठ, गोवळकोट रोड परिसरातील मोठे होर्डिंग व फलकधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. पालिकेची नोटीस हाती येताच काहींनी स्वतःहून फलक हटवले आहेत; मात्र त्यानंतरही काही ठिकाणी अनधिकृत फलक झळकू लागले आहेत.

त्यांच्यावर दोन दिवसात कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. शहरात काही मोक्याच्या ठिकाणी मोठमोठे होर्डिंग उभे आहेत. त्यावर नामांकित कंपन्यांच्या जाहिराती झळकत आहेत. संबंधित होर्डिंगसाठी पालिकेची परवानगी असली तरी त्यातील बहुतांशी होर्डिंग हे गंजलेल्या स्थितीत आहेत तसेच काही धोकादायक बनले आहेत. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे असून तशी मागणी आता होऊ लागली आहे.

स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचे – शहर परिसरात उभारण्यात आलेल्या अनेक होर्डिंग हे गंजलेल्या स्थितीत असून त्यातील काही धोकादायक बनले आहेत. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून या होर्डिंगचे वेळीच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular