27.2 C
Ratnagiri
Tuesday, October 22, 2024
HomeRatnagiriरत्नागिरीत ६० हजारांना बाळाची विक्री, पाच संशयितांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरीत ६० हजारांना बाळाची विक्री, पाच संशयितांविरुद्ध गुन्हा

सिद्धी हातिम यांच्या स्वराज नावाच्या दीड महिन्याच्या बाळाची विक्री केली.

रत्नागिरीमध्ये दिड महिन्याच्या बाळाची ६० हजाराला विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. मुंबईतील जोडप्याकडून बेकायदेशीरपणे मूल दत्तक घेणाऱ्या रत्नागिरी शिरगावातील दाम्पत्यासह ५ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळ घेणाऱ्या या दाम्पत्याने बाळाची नोंदणी करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. सिद्धी प्रसाद हातिम (वय २४, रा. रहेजा कॉम्प्लेक्स मालाड, मुंबई) या महिलेने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या महिलेच्या पतीसह अन्य चार जणांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

२३ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता रत्नागिरीतील दुय्यम निबंधक कार्यालयात बालक माता यांना आणून नोंदणी करण्यात आली. सिद्धी प्रसाद हातिम हिने काल शहर पोलिस ठाण्यात तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विवाहितेचा पती प्रसाद नरेंद्र हातिम (रा. रहेजा कॉम्प्लेक्स मालाड, मुंबई), बाळ खरेदी करणारे दांपत्य आज्ञा संतोष माने तिचा पती, संतोष विजय माने (दोन्ही रा. शिवरेवाडी शिरगाव, रत्नागिरी), मयुरी निखिल जाधव (रा. अंधेरी, मुंबई) आणि अजय जाधव (रा. बदलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. २३ फेब्रुवारी २०२४ ला दुष्यम निबंधक कार्यालयात महिलेला आणले.

या पाच संशयितांनी संगनमताने सिद्धी हातिम यांना धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्याकडून बेकायदेशीर दत्तकविधान पत्रावर सह्या घेतल्या. सिद्धी हातिम यांच्या स्वराज नावाच्या दीड महिन्याच्या बाळाची ६० हजार रुपयांना विक्री केली. त्यानंतर पीडित मातेचा पती प्रसाद याने मुंबईत गेल्यावर तिला घराबाहेर काढले. याप्रकरणी पाच जणांविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ८०,८१ भादंवि कायदा कलम ३२३,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास जाधव करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular