25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriरत्नागिरी शहरात दोन कोटींचे विक्री केंद्र - पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी शहरात दोन कोटींचे विक्री केंद्र – पालकमंत्री उदय सामंत

विक्री केंद्राच्या माध्यमातून येथील महिलांना रोजगाराचे दार उघडले जाणार आहे.

शहरात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (सर्वसाधारण) महिला व बाल सशक्तीकरणातील ३ टक्के राखीव निधीतून २ कोटी रुपये खर्च करून महिला बचतगटांना विक्री केंद्र तथा बचतगट भवनाचे भूमिपूजन झाले आहे. रत्नागिरी शहरातील हा प्रकल्प राज्यातील पहिला पायलेट प्रोजेक्ट आहे. हा उपक्रम भविष्यात आपल्या सगळ्यांचा आदर्श घेत महाराष्ट्रात राबवला जाणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ते भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे जो महिलांसाठी विक्री केंद्राचा उपक्रम राबवत आहे. ते पाहण्यासाठी इतर जिल्ह्यांतील महिलांना रत्नागिरीमध्ये यावे लागेल.

या विक्री केंद्राच्या माध्यमातून येथील महिलांना रोजगाराचे दार उघडले जाणार आहे. आज आमच्या सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. ज्या सरकारने तुम्हाला पाठिंबा दिला आहे त्या सरकारच्या मागे आपण महिलांनी उभे राहावे. महिलांना मी पालकमंत्री म्हणून दिलेला शब्द पूर्ण केल्याचा मला अभिमान आहे. शहरातील हे विक्री केंद्र महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल. उमेदच्या माध्यमातून चांगले काम केले आहे. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल, असे काम रत्नागिरीतील महिला बचतगटांनी पुढाकार घेऊन करून दाखवा. माझ्या मतदारसंघात येऊन काही लोकांनी माझ्यावर आणि सरकारवर टीका केली.

त्यांच्या खळा बैठकीचे उत्तर त्यांच्या वरळीच्या मतदारसंघात जाऊन देणार आहे. पालकमंत्री सामंत म्हणाले, या भवनामध्ये ४०० महिलांना प्रशिक्षण दिले जाईल. सीआरपींचे मानधन ६ हजार केले आहे, हा शब्द पूर्ण केला आहे. ३० तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २ हजार ४४३ महिलांना मोबाईल संच वाटप करण्यात येणार आहेत. राज्यातील पहिले बचतगटांचे विक्री केंद्र रत्नागिरीत होत आहे, याचा मला अभिमान आहे. त्यासाठी ९ कोटी ३ लाख रुपये महिला व बालविकास विभागाला दिले आहेत. जे जे आश्वासन दिले ते ते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, उपजिल्हाप्रमुख राजन शेट्ये, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, शहरप्रमुख बिपिन बंदरकर आदी- उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular