23.4 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriजिल्ह्यात ११ महिन्यांत ५१ दुचाकी चोरीला

जिल्ह्यात ११ महिन्यांत ५१ दुचाकी चोरीला

सेकंड हॅण्ड वाहन घेतानाही आपण चोरीचे वाहन तरी खरेदी करत नाही ना, याची शहानिशा करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात दुचाकी चोरण्याचा चोरट्यांचा हातखंडा अजूनही कायम आहे. गेल्या ११ महिन्यांत ५१ दुचाकी चोरट्यांनी चोरल्याची नोंद जिल्हा पोलिसदलाकडे झाली आहे. त्यापैकी २३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे आपली दुचाकी सुरक्षित कशी राहील, या दृष्टीने वाहनधारकांनी विचार करण्याची गरज आहे तसेच कमी किमतीत सेकंड हॅण्ड वाहन घेतानाही आपण चोरीचे वाहन तरी खरेदी करत नाही ना, याची शहानिशा करण्याची गरज आहे. दुचाकी चोरीचे प्रमाण गेल्या दोन वर्षांपेक्षा सध्या कमी असले तरी ते चिंताजनक आहे. यापूर्वी टोळक्याकडून दुचाकी हेरून त्या चोरल्या जात होत्या.

त्यांची दुसरी टीम काही क्षणात त्या दुचाकीचे सुट्टे पार्ट काढून अन्य वाहनांना बसवून त्या दुचाकी कमी किमतीत विकल्या जात होत्या. कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागांत हे प्रमाण कमी होते. त्यानंतर रत्नागिरीतही हे लोण आले. शहर पोलिसांनी अशाप्रकारची टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून नऊ ते दहा दुचाकी हस्तगत केल्या होत्या. काही चोरटे एखाद्या गाडीला चावी दिसली की, त्यातील पेट्रोल संपेपर्यंत फिरवायची आणि नंतर वाटेत सोडायची, असे प्रकारही उघड झाले आहेत. रेल्वेस्थानकातही पार्क केलेल्या दुचाक्या चोरीला गेल्या आहेत; परंतु सीसीटीव्ही, पोलिसांची गस्त आणि दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या हाताला लागल्याने हे प्रकार कमी झाले होते; मात्र आता पुन्हा दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे.

महिन्याला कमीत कमी चार ते पाच दुचाकी चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल होत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या अकरा महिन्यात जिल्ह्यातून ५१ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. नागरिकही कुठलीही शहानिशा न करता अशी वाहने कमी किमतीत मिळत असल्याने खरेदी करतात; मात्र असे करणे धोकादायक ठरू शकते. अनेकदा आपण खरेदी केलेले वाहन चोरीचे निघाल्यास कारवाईला सामोर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सेकंड हॅण्ड वाहन खरेदी करताना काळजी घ्या, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे. घराबाहेर पार्क केलेल्या किंवा कामानिमित्त बाहेर ठेवलेल्या दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना रत्नागिरीत वाढत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular