31.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeChiplunचिपळूण शहरात उभारणार सहा चार्जिंग पॉइंट

चिपळूण शहरात उभारणार सहा चार्जिंग पॉइंट

गेल्या काही वर्षांत सर्वत्र ई-बाईक तसेच ई-कारची संख्या वेगाने वाढत आहे.

शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच प्रदूषणाचा प्रश्नदेखील तितकाच उद्भवू लागला आहे. अशा परिस्थितीत प्रदूषणविरहित असलेल्या ई-बाईकना प्रोत्साहन देण्यासाठी नगर पालिकेकडून शहरात सहा चार्जिंग पॉइंट उभारले जाणार आहेत. त्याचे कामही सुरू झाले असून, येत्या आठ दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र व नगर पालिका अशा दोन ठिकाणी सहा चार्जिंग पॉइंट उपलब्ध केले जाणार आहेत. स्कॅनर स्वरूपात पैसे आकारले जाणार असल्याने नगर पालिकेलाही त्यातून फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षांत सर्वत्र ई-बाईक तसेच ई-कारची संख्या वेगाने वाढत आहे. चिपळूण शहरातील ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सद्यःस्थितीत शहरात पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे पंप उपलब्ध आहेत; मात्र ई-बाईक व ई-कारसाठी सुविधा नसल्याने काही वाहनधारकांना अडचणी येत आहेत. या विषयी काहींनी नगर पालिकेकडे चार्जिंग पॉइंटची मागणी केली होती. त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी याबाबत तत्काळ दखल घेत शहरात नगर परिषद व इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशा दोन ठिकाणी ई-चार्जिंग पॉइंट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

ई-चार्जिंग पॉइंटची सुविधा निर्माण केल्यास शहरात ई-कार व बाईकचा वापर वाढू शकतो. परिणामी, शहरातील प्रदूषणदेखील कमी होण्यास मदत होईल. या हेतूने नगर पालिकेने ई-चार्जिंग पॉइंट उभारण्याचा निर्णय घेतला. या कामास सुरुवातदेखील झाली आहे. चार्जिंगसाठी मोजावी लागणारी रक्कम स्कॅनरवरून नागरिकांना तेथेच भरता येणार आहे. शहरात परजिल्ह्यातून पर्यटनासह विविध कामांसाठी येणाऱ्या ई-कारची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या सुविधेचा त्यांच्यासह शहरवासीयांनाही लाभ होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular