26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiriगणेशगुळ्यात गलबतवाल्यांचा गणपती, नवस व हौसेसाठी आणतात ७० गणेशमूर्ती

गणेशगुळ्यात गलबतवाल्यांचा गणपती, नवस व हौसेसाठी आणतात ७० गणेशमूर्ती

गणेशगुळे गावातील कातळावर एक जागृत गणेश मंदिर आहे.

रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे गावामध्ये डोंगरावरील कातळावर गलबतवाल्यांचा गणपती असल्यामुळे गावांमध्ये गणेश चतुर्थीमध्ये घरोघरी गणेशमूर्ती आणण्याची पद्धत नव्हती, असे जाणकार सांगतात. परंतु बदलत्या काळानुसार हौशी लोक व नवसामुळे गणेशाच्या मूर्ती काही लोक आणत आहेत. मात्र गावाच्या तुलनेत भंडारवाडी परिसरात काही ठराविक गणेशमूर्ती वगळता सर्वजण कातळावरील गणेश मंदिरातील गणेशाला आपले दैवत माणून त्याची पूजा करत आहेत. गणेशगुळे गावातील कातळावर एक जागृत गणेश मंदिर आहे. हा गणपती लंबोदर रूपात आहे.

याची पौराणिक कथाही सांगितली जाते. फार वर्षांपूर्वी या समुद्रकिनाऱ्यावर राहणारे लोक मच्छीमारी व्यवसाय करीत होते. आजही काही प्रमाणात मच्छीमारी करतात. पूर्वी गलबते मच्छीमारीसाठी या किनाऱ्यावर वावरत होती. व्यवसाय चांगला व्हावा व समुद्रात कोणतीही समस्या येऊ नये याकरिता या गणपतीला मच्छीमार, गलबतवाले साकडे घालत. संकट दूर करण्यासाठी मागणी करत व त्याला गणेशाचे चांगले पाठबळ असल्यामुळे या गणपतीला गलबतवाल्यांचा गणपती असे म्हटले जाते. गणेशोत्सवाच्या काळामध्ये स्वतःच्या घरी मूर्ती न आणता कातळावर गणपती हा आपलाच आहे, असे मानून त्याची मनोभावे सेवा करतात.

भंडारवाडीतील सर्वच लोक या गणपतीला पूजतात. परंतु गावातील अन्य लोक आपापल्या घरी गणपती आणून पूजन करत आहेत. नवसाकरिता म्हणून काही लोक गणेशचतुर्थीच्या वेळी गणेशमूर्ती आणू लागले. हौसेने व नवसाने आणलेल्या गणेशमूर्ती यांची संख्या सध्या सत्तर आहे. गावातील दहा वाड्यांतून हे गणपती आणले जातात. यातील साठ गणपती गौरी विसर्जनच्या वेळी विसर्जन केले जातात. दहा गणपती अनंत चतुर्दशीला विसर्जित केले जाणार आहेत. भंडारवाडी परिसरात नवसाच्या सात गणेशमूर्ती आणल्या आहेत.

अन्य वाडीतील भंडारी समाजातील कुटुंबे आपल्या घरी गणपती न आणता गणेश मंदिरातील गणपतीला आपले दैवत मानतात. त्याची मनोभावे सेवा करण्याचे काम या भंडारवाडी परिसरातील व गावातील अन्य कुटुंबे करीत आहेत. माघ महिन्यातील चतुर्थीला या मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. कोणत्याही गावांमध्ये नवीन घर बांधले की प्रत्येक जण गणपती आणतो. चार भाऊ असतील तरी चार गणपती आणतात. इतर गावांच्या तुलनेमध्ये गणेशगुळे गावांमध्ये दहा वाड्या असूनही ७० गणपती आणले जातात.

RELATED ARTICLES

Most Popular