24 C
Ratnagiri
Thursday, February 12, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeRatnagiriसंकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विशेष सुविधा

संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विशेष सुविधा

आधारवरील माहितीच्या तपशीलातील बदल करण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे फी आकारण्यात येईल.

श्रीदेव गणपतीपुळे संस्थान आणि रत्नागिरी डाकघर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १६ जुलै २०२२ रोजी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून गणपतीपुळे व पंचक्रोशीतील नेवरे, धामणसे, ओरी, चाफे, वरवडे, मालगुंड, खालगांव इत्यादी गावातील नागरिकांसाठी व भाविकांसाठी आधार नोंदणी व अद्ययतन करण्याचे भव्य शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरात नवीन आधार काढणे, ० ते ५ वयोगटातील मुलांचे आधार काढणे, आधारवरील फोटो/ जन्मतारीख /पत्ता /नावात बदल / तसेच लग्नानंतरचे नाव बदलणे, हाताचे ठसे (बायोमेट्रिक) अपडेट करणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

टपाल विभागाने ० ते १० वयोगटातील मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते,  PPF बाबत माहिती,  TATA AIG चा रू.३९९/- मध्ये दहा लाखांचा अपघात विमा कवच या सोबतच डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा यासारख्या विविध योजनाची माहिती देण्यात येणार आहे. तसेच त्याच दिवशी लहान मुलांचे बाल आधार काढणे, आधारला मोबाईल क्रमांक /ई-मेल लिंक करणेची विशेष मोहीम गणपतीपुळे पंचक्रोशीतील सर्व गावांच्या सर्व अंगणवाडीमध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांकडून राबविण्यात येणार आहे.

ज्या नागरिकांना त्यांचे आधार वरील तपशिलांमध्ये बदल करून घ्यायचा आहे, अशांनी त्यांचे मूळ आधारकार्ड सोबत ठेवावे. तसेच लहान बालकांचे आधार कार्ड काढण्यासाठी पालकांचे मूळ आधारकार्ड व बालकाचा जन्मदाखला आवश्यक आहे. आधारवरील माहितीच्या तपशीलातील बदल करण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे फी आकारण्यात येईल.

टपाल विभाग आणि संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ गणपतीपुळे व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अधिक्षक डाकघर रत्नागिरी विभाग एन.टी.कुरळपकर यांनी केले आहे..

RELATED ARTICLES

Most Popular