21.9 C
Ratnagiri
Thursday, February 19, 2026

देवरूख व संगमेश्वर बाजारपेठेत ओले काजूगर दाखल, दर चढाच

कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...

मोहर, फळगळतीमुळे बागायतदार हवालदिल

बदलत्या हवामानाच्या दुष्टचक्रातून अजून आंबा पीक सुटलेले...

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...
HomeRatnagiriपुण्यातील भ्याड हल्ला प्रकरणी, आमदार सामंत कट्टर समर्थकांचा जोरदार निषेध

पुण्यातील भ्याड हल्ला प्रकरणी, आमदार सामंत कट्टर समर्थकांचा जोरदार निषेध

सामंत हे संयमी व्यक्तिमत्त्व आहे. या घटनेनंतरही ते शांत असले तरी आम्ही रत्नागिरीकर या हल्ल्याला उत्तर देण्यास कधीही तयार आहोत.

पुण्यातील कात्रज मध्ये झालेल्या माजी मंत्री व एकनाथ शिंदे गटाचे उपनेते आमदार उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद आज रत्नागिरीत उमटताना सकाळी सामंत यांच्या जयस्तंभ कार्यालयासमोर त्यांच्या कट्टर समर्थकांनी जोरदार निषेध नोंदविला. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आमदार उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा समस्त रत्नागिरीकर निषेध करीत आहेत. आम्ही शांत आहोत म्हणजे हतबल आणि असाह्य नाही. सामंत हे संयमी व्यक्तिमत्त्व आहे. या घटनेनंतरही ते शांत असले तरी आम्ही रत्नागिरीकर या हल्ल्याला उत्तर देण्यास कधीही तयार आहोत. शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखत संशयितांवर त्वरित कारवाई करावी, अशी थेट प्रतिक्रिया कट्टर सामंत समर्थकांनी दिली आहे. या हल्ल्याचे पडसाद तत्काळ रत्नागिरीत उमटले असून अनेक ठिकाणी या भ्याड हल्ल्याचा निषेध करणारे फलक रातोरात शहरामध्ये झळकू लागले आहेत.

आमदार सामंत आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शांत आहे, याचा अर्थ हतबल नाही’, अशा भ्याड हल्ल्याने उदय सामंत थांबणार नाहीत’,  आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, ‘उदय सामंतसे जो टकरायेगा, वो मिट्टीमें मिल जायेगा’, ‘अशा गगनभेदी घोषणा देत सामंतांवर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आलेत.

या संदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. भ्याड हल्ला करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. यापुढेही दौऱ्यादरम्यान अशा स्वरूपाच्या घटना घडू नयेत, यासाठी गृह विभागाने काळजी घ्यावी व सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular