पावसाठी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर चांगलाच निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ”एकनाथराव शिंदे तुम्ही नाव शिवसेनेचं घेता आहात आणि सर्व निर्णय व कार्यक्रम मात्र भाजपाचे राबवताय. गेल्या दीड दोन महिन्यातील असा एक निर्णय दाखवा जो तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनाने घेतला आहात.
आणि तुम्हीच आधी घेतलेले सर्व निर्णय ते तुमच्याकडून बदलून घेत आहेत. सावध व्हा. असा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा देत, कारभार करायचा तर स्वाभिमानाने करा. गरज फक्त तुम्हाला नाही. त्यांनाही आहे. सत्ता त्यांनाही हवीच होती, ते कितीही नाही म्हणत असले तरी ते सत्तेसाठीच तडफडत होते. सत्तेच्या बाहेर राहून त्यांची अवस्था पाण्याबाहेर आलेल्या तडफडणाऱ्या माशासारखी झाली होती. असा थेट आरोप भास्कर जाधव यांनी भाजपवर केला आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर तोंडसुख घेतले आहे. शिंदे तुम्ही नाव शिवसेनेचं घेता अन् कार्यक्रम भाजपाचा राबवता असा सणसणीत टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला आहे.
ज्यांनी स्वतःच्या खात्याच्या घेतलेला कारभारआत्ता स्वतःच बदलायचा निर्णय घेतला यांचा अर्थ आता असलेले सरकार भाजपच्या हातातील बाहुली बनली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नगरपालिकेच्या, महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याचं आहेत. आता प्रभाग रचना पुन्हा होणार आहे. झालेली प्रभाग रचना रद्द झालेली आहे, पण वॉर्ड रचना पडलेले आरक्षण पुन्हा बदलत आहेत. कोणा करता बदलत आहेत? कोण आहे यांच्या पाठीमागे? याचा शोध घेणे गरजेचे आहे अस पुढे जाधव म्हणाले.