26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriशांत डोक्याने, करेक्ट प्लान करून पत्नीचा काढला काटा

शांत डोक्याने, करेक्ट प्लान करून पत्नीचा काढला काटा

जेवण करण्यात त्या गुंग असताना अचानक त्यांच्या गळ्याभोवती सुकांत याने नायलॉनची दोरी आवळली.

स्वप्नाली सावंत बेपत्ता ते हत्या प्रकरणी रत्नागिरी पोलीस कसून तपास करत असून अनेक धक्कादायक सत्य बाहेर पडत आहेत. खुद्द स्वप्नाली यांच्या पतीने शांत डोक्याने प्लान करून पत्नीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. स्वप्नाली यांना मारण्याचा प्लान दीड वर्षापासून आणि गणपतीतच पार पाडायचा हे त्याने ठरवले होते.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुकांत सावंत याने १ रोजी दुपारी प्रथम स्वप्नाली सावंत हिचा गळा दाबून हत्या केली. स्वप्नाली या गणपती सणानिमित्त मिऱ्या येथे राहायला येणार याची पती सूकांत याला कल्पना होती. त्यामुळे स्वप्नाली यांचा काटा काढण्याची ही नामी संधी असल्याचे सुकांत याने जाणले.

जेवण करण्यात त्या गुंग असताना अचानक त्यांच्या गळ्याभोवती सुकांत याने नायलॉनची दोरी आवळली. काही मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला. दिवसभर मृतदेह घरातील मागच्या बाजूला पेंढ्यांमध्ये लपवून ठेवण्यात आला. त्यानंतर सायंकाळी चुलत भाऊ छोटा भाई व एका कामगाराला बोलावले. तिघांनी रात्री घराच्या आवारातच मृतदेह जाळून टाकला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तेथील राख, अस्थी गोणीत भरून समुद्रात फेकून देण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

वर्ष-दीड वर्षापासून कट रचून अखेर १ सप्टेंबर २०२२ ला दुपारी रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा गळा दाबून त्यांच्या पतीने निर्घृण हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्यानंतर आपल्यावर कोणता संशय येऊ नये यासाठी त्याने स्वतः पोलिस स्थानकात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. खुनानंतर मृतदेह घराच्या मागे जाळून सुमारे ७ ते ८ गोणींत राख आणि अस्थी भरून त्या समुद्रात टाकून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला आहे. परंतु, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून आरोपी सुटले नाहीत. पाठीमागे काही न काही पुरावा सुटतोच. आणि त्यातूनच पोलिसांनी बरोबर आरोपीला हेरले.

RELATED ARTICLES

Most Popular