26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeSindhudurgदुग्धोत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषद सरसावली

दुग्धोत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषद सरसावली

खरेदी करण्यात येणाऱ्या जनावरांच्या गोठ्याचा व पशूंना उपयोगी असलेल्या कृत्रिम रेतन प्रशिक्षित व्यक्तींचा प्रश्न निर्माण होत आहे. आता ही जबाबदारी जिल्हा परिषदेने घेतली आहे.

तळकोकणात दुधाळ जनावरे दिवसेंदिवस वाढत आहेत परंतु, त्यांना आवश्यक असणाऱ्या गोठ्यांची संख्या मात्र कमी पडत आहे. यावर उपाय योजना म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहे;  परंतु त्या गुरांची चांगली देखभाल करण्यासाठी गोठेच उपलब्ध नसल्याने पुन्हा गोठ्यांच्या बांधणीसाठी शेतकऱ्याना वेगळे कर्ज घ्यावे लागत आहे. म्हणून जिल्हा परिषद, जिल्हा बँक व भगीरथ प्रतिष्ठान यांच्यामध्ये संयुक्त बैठक झाली. या बैठकीला सीईओ नायर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, डॉ. विद्यानंद देसाई, सुधीर चव्हाण, डॉ. रवींद्र दळवी, राजेंद्र पराडकर, प्रमोद गावडे, विजय चव्हाण, विनायक ठाकूर, डॉ. प्रसाद देवधर, वैभव पवार, कर्मचारी चव्हाण आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील दुग्धोत्पादन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पुढाकार घेत एक हजार दुधाळ जनावरे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र या खरेदी करण्यात येणाऱ्या जनावरांच्या गोठ्याचा व पशूंना उपयोगी असलेल्या कृत्रिम रेतन प्रशिक्षित व्यक्तींचा प्रश्न निर्माण होत आहे. आता ही जबाबदारी जिल्हा परिषदेने घेतली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गोठे उपलब्ध करून देण्याचा तसेच इच्छुक तरुणांना पशू उपचाराचे ४० दिवसांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर गोठोस व निवजे या दोन गावांची निवड करण्यात आली आहे. याबाबत सीईओ प्रजित नायर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

सीईओ नायर यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत दुधाळ जनावरे पुरविणे, गोठे उपलब्ध करून देणे आणि पशुधनसाठी प्रशिक्षित कृत्रिम रेतन मनुष्यबळ उपलब्ध करून देणे यावर सखोल चर्चा करून पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत सुविधा शोधण्यात आली. यावेळी सुरुवात जिल्ह्यात एकूण किती ठिकाणी दूध संकलन केंद्र आहेत, या विषयापासून करण्यात आली. जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांनी केवळ एकाच तालुक्यात हा प्रयोग न करता प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करावी, असे सुचवले. अखेर कुडाळ तालुक्यातील गोठोस व निवजे या दोन गावांमध्ये हा प्रयोग करण्याचे निश्चित करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular