26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeSindhudurgआम. नीतेश राणेंनी पाठपुरावा केल्याने, मत्स्य विद्यालयाला मान्यता

आम. नीतेश राणेंनी पाठपुरावा केल्याने, मत्स्य विद्यालयाला मान्यता

हे महाविद्यालय सिंधुदुर्गात होण्यासाठी आमदार राणे यांनी राज्य व केंद्र स्तरावर अधिक प्रमाणात पाठपुरावा केला.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक ओरोस या ठिकाणी आमदार राणे यांची मच्छीमार संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेत मत्स्य महाविद्यालयासाठी आमदार नीतेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत. देवगड तालुक्यातील गिर्ये येथे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय प्रस्तावित आहे. या महाविद्यालयाची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, याबाबतची घोषणा आमदार नीतेश राणे यांनी नुकतीच जाहीर केली. या मत्स्य महाविद्यालयाच्या घोषणेचे मच्छीमार वर्गातून स्वागत केले जात आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून फक्त रत्नागिरी शिरगाव येथे मत्स्य महाविद्यालय आहे. कोकणातील वाढत्या मासेमारी व्यवसाय विचार घेतला असता, भविष्यात मोठ्या प्रमाणात मत्स्यक्षेत्रातील तज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. सिंधुदुर्गात होणाऱ्या या मत्स्य महाविद्यालयामुळे स्थानिक प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होणार आहे. तसेच मत्स्य व्यवसायास बळकटी मिळणार आहे. हे महाविद्यालय सिंधुदुर्गात होण्यासाठी आमदार राणे यांनी राज्य व केंद्र स्तरावर अधिक प्रमाणात पाठपुरावा केला.

यामुळेच लवकर मत्स्य महाविद्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी श्री. राणे यांनी केलेला पाठपुरावा नक्कीच वाखाणण्याजोगा असल्याची प्रतिक्रिया मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केली आहे. या भेटीवेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा महिला मच्छीमार सहकारी संस्था अध्यक्षा स्नेहा केरकर, दांडी येथील पारंपरिक मच्छीमारांचे प्रतिनिधी नारायण धुरी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे, हे मत्स्य विद्यापीठ कोणत्याही परिस्थितीत नागपूर स्थित मत्स्य विद्यापीठास जोडता डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनाच संलग्न राहावे, अशी आग्रही मागणी उपस्थित प्रतिनिधींनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular