29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...

वाढत्या समस्यांनी रत्नागिरीकर त्रस्त, शहराच्या दुरवस्थेबाबत भाजप आक्रमक

शहरातील खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, गटारांची खराब...
HomeEntertainmentतिच्या आत्म्यानं परत यावं, अन् त्याचे ७० तुकडे करावेत

तिच्या आत्म्यानं परत यावं, अन् त्याचे ७० तुकडे करावेत

बॉलीवुड प्रसिद्ध निर्माते राम गोपाल वर्मा यांनीही ट्विट करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

श्रद्धा वालकर,  देशाला हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आफताब पूनावाला या तरुणाकडून फसवणूक आणि मग अत्यंत निष्ठूरपणे तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सर्व स्तरातून निषेध केला जात असतानाच, बॉलीवुड प्रसिद्ध निर्माते राम गोपाल वर्मा यांनीही ट्विट करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. एवढेच नाही तर अत्यंत कठोर शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मूळची वसईची असलेली श्रद्धा प्रियकर आफताब पूनावालाबरोबर आधी नायगाव येथे राहत होती मात्र नंतर ते दिल्लीमध्ये स्थायिक झाले. ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. दिल्लीला गेल्यावर श्रद्धाने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. या मुद्द्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. आणि भांडणा दरम्यान आफताबने तिचा गळा आवळून खून केला.

एवढ्यावरच न थांबता मस्तकात भरलेल्या रागाने त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून १८ दिवस फ्रीजमध्ये ठेवले. दरम्यान तो इतर मुलींशी डेट देखील करत होता. पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अशा गुन्हेगाराला काठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वजण आग्रही आहेत. अगदी सोशल मीडियावरही या प्रकरणावर चर्चा होत आहेत. अनेक कलावंत त्याबाबत व्यक्त होत आहे. आता राम गोपाल वर्मा यांनीही ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

“तिच्या आत्म्यानं परत यावं, अन् त्याचे ७० तुकडे करावेत’ असं ट्वीट राम गोपाल वर्मानं शेअर केलं आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटलं आहे की, ‘केवळ कायद्याच्या भीतीने क्रूर हत्या रोखता येत नाहीत. पण त्या घटनेचा बळी ठरलेल्या व्यक्तीच्या आत्म्यानं परत येऊन मारेकऱ्यांना मारले तर ते नक्कीच हे थांबवता येईल. देवाने याचा विचार करावा आणि आवश्यक ते करावे ही विनंती. अशा शब्दांत तीव्र निषेध केला आहे.

पुढे ते म्हणतात, तिला न्याय मिळावा असे सगळ्यानांच वाटते पण, तिच्या आत्म्याला शांती मिळण्याऐवजी तिने परत यावे आणि त्याचे ७०  तुकडे करावे.’ राम गोपाल वर्मा यांच्या या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सध्या सर्व देशाचे लक्ष श्रद्धा हत्या प्रकरणावर लागलेले आहे. सर्व स्तरातून तिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षाच व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular