28.4 C
Ratnagiri
Tuesday, September 9, 2025

रत्नागिरीत मच्छिमारी करून परतणारी बोट उलटली

शहराजवळील कर्ला येथील अमिना आयशा नावाची होडी...

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...
HomeRatnagiriआर्थिक व्यवहारातून तरुणावर हल्ला, केले कोयतीचे सपासप वार

आर्थिक व्यवहारातून तरुणावर हल्ला, केले कोयतीचे सपासप वार

अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये नागेश गंभीर स्वरुपात जखमी झाल्याने त्याला स्थानिकांनी नागेशला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

रत्नागिरी शहरातील पऱ्यांची आळी येथे तीन ते चार तरुणांनी एका तरुणाच्या डोक्यात लादी घालून आणि त्यानंतर धारदार कोयत्याने त्याच्या डोक्यावर आणि  हातावर वार केले. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. नागेश प्रकाश गजबार वय २७ रा. कुवारबाव, असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे;  परंतु भर बाजारपेठेत अशा प्रकारचा गंभीर हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जखमीवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे राहणाऱ्या नागेशला काही तरुणांनी फोन करून शहरातील पऱ्याची आळी येथे बोलावले. कॉंग्रेस भुवन नजीकच्या प्रभा हॉटेलच्या निमुळत्या गल्लीमध्ये हा प्रकार घडून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बोलवणारे तीन ते चार तरुण हे त्याच्याच परिचयातील होते, परंतु नागेश पऱ्याची आळी येथे आल्यानंतर त्यातील एका तरुणाने थेट त्याच्या डोक्यात लादी घातली. त्यानंतर दुसऱ्या तरुणाने धारदार कोयत्याने नागेशच्या डोक्यावर, हातावर सपासप वार केले. त्यानंतर त्या तरुणानी घटनास्थळावरून पलायन केले.

या अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये नागेश गंभीर स्वरुपात जखमी झाल्याने त्याला स्थानिकांनी नागेशला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासह घटनास्थळी पाहणी केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते; परंतु हल्लेखोर रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांना सापडले नाहीत. त्यांचा शोध पोलीस कसोसीने घेत आहेत. या घटनेने रत्नागिरी शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular