28.6 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriकोकणात शालेय सहलींची सुरुवात, स्थानिक व्यावसायिकांना लाभ

कोकणात शालेय सहलींची सुरुवात, स्थानिक व्यावसायिकांना लाभ

शाळांकडून दरवर्षी सहलींचे नियोजन केले जाते. यामध्ये देवस्थानं, किल्ले, समुद्र किनारे, महापुरुषांची जन्मस्थानं अशा ठिकाणांचा सर्वाधिक समावेश असतो.

शाळा आणि सहल हे विशेष कनेक्शन असते. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या महामारीमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सहली बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर २०२२ च्या सुरवातीला सर्व निर्बंध हळूहळू उठायला सुरुवात झाली आणि सोबतच सहलींना देखील आरंभ झाला आहे. साधारण पावसाळा संपल्यानंतर हिंवाळ्याला सुरुवात झाली कि, नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर व किनारा, मत्स्यालय, पावस या ठिकाणी पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातून दिवसाला पाचहून अधिक सहलींच्या गाड्या दाखल होऊ लागल्या आहेत.

कोकणातील समुद्र किनाऱ्याचे विशेष आकर्षण सर्वाना असते. त्यामुळे समुद्र किनाऱ्‍यावरही प्रचंड गर्दी वाढत आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांवरील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक उलाढालीत वाढ झाली आहे.

शाळांकडून दरवर्षी सहलींचे नियोजन केले जाते. यामध्ये देवस्थानं, किल्ले, समुद्र किनारे, महापुरुषांची जन्मस्थानं अशा ठिकाणांचा सर्वाधिक समावेश असतो. कोकणातील समुद्रकिनाऱ्‍‍यांवरील देवस्थानांकडे सहलींचे आयोजन करण्याचा ओढा अनेक शाळांचा असतो. कोरोनातील परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सहलीही बंद केल्या होत्या. या वर्षाच्या सुरवातीला निर्बंध उठल्यामुळे सहलींना पुन्हा सुरवात झाली आहे. यासाठी सर्वाधिक एसटीच्या गाड्यांचे आरक्षण केले जाते.

कोकणाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने, पश्‍चिम महाराष्ट्रातून सांगली, कोल्हापूर, सातारा या परिसरातून कोकणात एक दिवसांची ट्रीप दाखल होते. रत्नागिरीत गणपतीपुळे मंदिर आणि समुद्रकिनारा, पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर, रत्नागिरी शहरातील मत्स्यालय व भगवती किल्ला, थिबा राजवाडा, टिळक स्मारक यासह विविध छोट्या-मोठ्या पर्यटनस्थळांवर सहलींच्या गाड्या दिसत आहेत. दिवसातून पाच ते दहा गाड्या दाखल होत असून सरासरी पाचशेहून अधिक विद्यार्थी या परिसराला भेटी देतात.

त्याप्रमाणे, शनिवारी, रविवारी सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेत दररोज ७ ते ८ हजार पर्यटक या स्थळी भेट देत आहेत. मत्स्यालयामध्ये यंदाच्या वर्षात ५१ सहलींची नोंद झाली आहे. त्यात एकट्या नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक सहली आलेल्या आहेत. उस्मानाबाद, बीडसह पश्‍चिम महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांचा समावेश आहे. विविध प्रकारचे मासे, देवमाशांचा सांगाडा, शंभर वर्षांपूर्वीची कासवं ही मुलांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेली आहेत. पर्यटन हंगाम दिवाळी आणि ख्रिसमस सुट्ट्यांमध्ये येतो; मात्र शालेय सहलींमुळे प्रसिद्ध पर्यटनस्थळांवरील फेरीवाल्यांसह छोट्या-छोट्या स्थानिक व्यावसायिकांना फायदा होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular