26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriस्वत:चे विक्रम मोडीत काढत, अविराजने रचले नवे विक्रम

स्वत:चे विक्रम मोडीत काढत, अविराजने रचले नवे विक्रम

अंडर १८ वर्षाखालील गटात भारताच्या पश्चिम विभाग क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाखालील लीग स्पर्धेत सुमारे ८१ बळी मिळवून त्याने रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. यापूर्वी त्याचे रेकॉर्ड ५६ बळींचे होते. अविराजने ते पार करत नवनवे विक्रम स्थापित केले आहेत. वयाच्या पाचव्या वर्षांपासून क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्‍या अविराजने महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्‍वात अल्पावधीतच यशस्वी कामगिरी केली आहे.

पुणे येथील आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराज गावडे याने एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट लोणी या महाविद्यालयाविरुद्ध सामन्यात दोन षटकात एकही धाव न देता नऊ विकेट घेत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या व्यतिरिक्त विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये ऑलराउंडर कामगिरी करत अविराजने साऱ्‍यांची मने जिंकून घेतली. त्याने केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली असून, त्याची अंडर १८ वर्षाखालील गटात भारताच्या पश्चिम विभाग क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती.

सध्या पुणे येथे आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. अविराज गावडे हा राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज लांडेवाडी, भोसरी पुणे या महाविद्यालयाच्या संघातून खेळत आहे. या स्पर्धेतील एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाविरुद्ध झालेल्या सामन्यात अविराजने दोन षटकांत एकही धाव न देता नऊ बळी घेण्याची कामगिरी नोंदवली आहे. ही कामगिरी करत अविराजने स्वतःचा विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तत्पूर्वी आयआयटी हिंजवाडी पुणे महाविद्यालय विरुद्ध सामन्यामध्ये देखील अविराजने दोन षटकांत चार धावा देत ७ बळी घेतले होते.

RELATED ARTICLES

Most Popular