26.9 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeChiplunमालघर पवारवाडी पाण्याच्या तळी दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे

मालघर पवारवाडी पाण्याच्या तळी दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे

कामात सुधारणा करूनच मक्तेदारास बिल अदा करावे, अशी मागणी सरपंच सुनील वाझे यांनी उपअभियंत्याना पत्राद्वारे केली आहे.

चिपळूण तालुक्यातील मालघर पवारवाडी येथे पाण्याची तळी दुरुस्तीसाठी सुमारे ११ लाखाचा निधी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी या तळीसाठी जिल्हा परिषद सेसमधून निधी उपलब्ध करून दिला; येथे पाण्याची तळी बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र सदरचे काम अंदाजपत्रकानुसार केले जात नाही. या कामाचा ग्रामस्थांना फारसा उपयोग नसला तरी निधीच्या मंजुरीमुळे कोणी आक्षेप घेतला नव्हता. मात्र प्रत्यक्षात तळी दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाल्यावर ते अगदी सुमार दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

श्रीकृष्ण मजूर संस्थेच्या नावाने या कामाचा ठेका देण्यात आला आहे. पण काम चांगल्या दर्जाचे न करता, तसेच ते परिपूर्ण झालेले नसताना देखील तेथे कामाच्या माहितीचा फलक मात्र झळकलेला दिसून येत आहे. याच ठेकेदाराने पोसरे येथील गणेशविसर्जन घाटाचे काम केले होते. तेथेही पहिल्याच पावसात घाटाच्या लाद्या उखडून आल्या होत्या. त्यामुळे, कामात सुधारणा करूनच मक्तेदारास बिल अदा करावे, अशी मागणी सरपंच सुनील वाझे यांनी उपअभियंत्याना पत्राद्वारे केली आहे. परंतु, राजकीय नेत्यांचा वापर करून बिल मिळण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

त्यातच मालघर पवारवाडी येथे सुरू असलेल्या या कामावरून ग्रामस्थांच्या तक्रारी वाढत आहेत. तळीत पाण्याचा साठा व्हावा. येथे गणेशमूर्तीचे विसर्जन व्हावे यासाठी काँक्रिटीकरणाचे काम केले जात आहे; मात्र झालेल्या काँक्रिटीकरणावर नियमितपणे पाणी मारले जात नसल्याने काही दिवसातच भिंतीला तडे जायला लागले आहेत. काँक्रिटीकरणाचे फिनिंशिंगदेखील अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.

मालघर ग्रामपंचायतीने या कामाची तक्रार केल्यानंतर संबंधित शाखा अभियंत्यांनी कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे त्यांनी मान्य केले. त्यानुसार संबंधित ठेकेदारास कामात सुधारणा करून दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular