30.4 C
Ratnagiri
Saturday, May 10, 2025

परशुराम घाटात पाण्यासाठी धबधब्याची रचना…

पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या परशुराम घाटात गॅबियन...

जिल्हा रुग्णालयातील ‘पोलिस चौकी’ अदृश्य…

रुग्ण, अपघातग्रस्तानांना तातडीची मदत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय...

‘साथी’मुळे बनावट बियाणे विक्रीस पायबंद फसवणुकीला आळा

बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस पायबंद...
HomeRatnagiriपालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

या सुविधेचे उद्‌घाटन गुरुवारी दि. २९ सायंकाळी करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटक आपसूकच पालशेतच्या समुद्रकिनाऱ्याकडे वळतील.

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक विशेषच समीकरण आहे. अनेक पर्यटक कोकणात दाखल झाले असून, कोकणवासिय देखील पर्यटकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी सज्ज झाले आहेत. गुहागर पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी जेट स्कीद्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्‌घाटन गुरुवारी दि. २९ सायंकाळी करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटक आपसूकच पालशेतच्या समुद्रकिनाऱ्याकडे वळतील.

सध्या सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत जेट स्कीद्वारे समुद्रसफरीचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. सागरी साहसी खेळांच्या पालशेत किनाऱ्यावरील सुविधेचे उद्‌घाटन गुरुवारी ता.२९ पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. जितेंद्र जोशी यांनी सुरुवातीला सागरपूजन करून त्या नंतर दोन्ही जेटस्कींचे पूजन केले. त्यानंतर पालशेतचे उपसरपंच महेश वेल्हाळ, उद्योजक राजन दळी, लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू, गुहागर शहर व्यापारी संघटना अध्यक्ष नरेश पवार, पालशेतमधील हॉटेल व्यावसायिक पांडुरंग विलणकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.

या वेळी आंबा बागायतदार विलास ओक, नरवणचे डॉ. कैलास वैद्य व मधुरा वैद्य, सरपंच संपदा चव्हाण, पंकज बिर्जे, पद्मनाभ जोशी आदी उपस्थित होते. उद्‌घाटनानंतर जेटस्कीवरून पहिली समुद्रसफर करण्याचा मान चौथीत प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झालेला अर्णव पाटील, तिसरीत प्रथम क्रमांक मिळवणारी शालवी तोडणकर आणि जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी पालशेतकर विद्यालयाची विद्यार्थिनी प्रगती जोशी यांना देण्यात आला.

या वेळी मनोगत व्यक्त करताना जितेंद्र जोशी म्हणाले, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसेच पर्यटन विभागाच्या सर्व परवानग्या घेऊन ही सुविधा पालशेत समुद्रकिनारी आपण सुरू केली आहे. या कामासाठी मेरीटाईम बोर्डाचे क्षेत्रीय बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांचे मार्गदर्शन योगदान मिळाले. त्यातून पालशेतमध्येही पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. अशी अपेक्षा लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू यांनी व्यक्त केली. सी स्टॉर्म व सी स्पिरिट या दोन नवीन जेट स्कीद्वारे सागरी साहसी खेळ सुविधा आजपासून पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरू झाल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular