26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriपावसाळ्यात लाटांचा तडाख्यापासून संरक्षण , चार ग्रोयनच्या कामाला वेग

पावसाळ्यात लाटांचा तडाख्यापासून संरक्षण , चार ग्रोयनच्या कामाला वेग

मिऱ्या किनाऱ्यावरील लोकवस्तीच्या सुरक्षेसाठी उभारण्यात येणाऱ्या ग्रोयन पद्धतीच्या बंधाऱ्याचे सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यामध्ये लाटांचा तडाखा बसून पाणी गावात शिरू नये यासाठी किनाऱ्यावर दगड आणि टेट्रापॉडस् भिंत उभारली आहे. समुद्राच्या लाटांचा वेग कमी करण्यासाठी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या सातपैकी चार ग्रोयनचे काम वेगाने सुरू आहे. याला पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणाच्या लाटांचा तडाखा किनाऱ्यावरील मिऱ्या ग्रामस्थांना बसत आहे. पांढऱ्या समुद्रापासून ते मिऱ्यापर्यंत सुमारे पावणेदोन किलोमीटर अंतराच्या किनाऱ्यावरील लोकं दरवर्षी पावसाळ्यात भितीच्या
छायेखाली राहतात.

येथील लोकांच्या सुरक्षेसाठी अनेकवेळा आवाज उठवला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनीही या ठिकाणी व्हाव्यात पाठपुरावा कायमस्वरूपी म्हणून केला. त्यानंतर उपाययोजना शासनदरबारी दीडशे कोटी रुपयांचा प्रोयन पद्धतीचा बंधारा उभारण्याला मंजुरी मिळाली. त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला थोड्या उशिराने सुरवात झाली. गेल्या सहा महिन्यामध्ये कामांचा वेग वाढला आहे. नव्या पद्धतीमध्ये किनाऱ्यावर हजार टनाहून अधिक वजनाचे मोठे दगड लावण्यात आले आहेत. त्यानंतर लाटा आपटण्यासाठी भलेमोठे टेट्रापॉडस् टाकण्यात आले आहेत. त्यामुळे लाटांपासून हा किनारा सुरक्षित होईल, असा दावा केला जात आहे.

किनाऱ्यापासून समुद्रात सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंत ग्रोयन म्हणजेच टेट्रापॉडसची शंभर मीटर जाडीची भिंत टाकली जात आहे. येथे सात ग्रोयन उभारण्यात येणार आहेत. दोन ग्रोयनमधील अंतर सुमारे दोनशे ते तीनशे मीटर असेल. आतापर्यंत चार ग्रोयनचे काम युद्धपातळीवर सुरू असून तीनचे काम जवळपास पूर्ण झालेले आहेत. याला लागणारे सिमेंटचे टेट्रापॉडस् एमआयडीसीमध्ये बनवले जात आहेत. तेथून लॉरीमधून वाहून मिऱ्या गावात आणले जात आहेत. सध्या या ठिकाणी तीन ते चार क्रेन, डंपर, पोकलेन ठेवण्यात आले आहेत.

लाटांचा वेग कमी होईल – किनाऱ्यापासून आत उभारल्या जाणाऱ्या प्रोयन बंधाऱ्यांमुळे लाटांचा वेग कमी होणार आहे. लाटा प्रोयनच्या आतील भागावर आपटतील आणि समुद्राचे पाणी किनाऱ्यावर वेगाने येणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular