26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriआजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू होत असून अनेक मच्छीमारांनी नौका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे. साडेचार हजारांहून अधिक नौका किनाऱ्यावर विसावल्या आहेत. मात्र, यंदा अजूनही पावसाची चिन्हे नाहीत, समुद्रही खवळलेला नाही. त्यामुळे बंदी मोडून काही मच्छीमार समुद्रात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर मत्स्य विभागाकडून करडी नजर ठेवली जाणार असून बंदरांवर अधिकारी नेमण्यात येणार आहेत. जानेवारीपासून पर्ससिननेटद्वारे मासेमारी करण्यासाठी बंदी असते तर ट्रॉलिंग किंवा यंत्राद्वारे मासेमारी करणाऱ्यांसाठी ३१ मे रोजी रात्री बारा वाजल्यानंतर बंदी कालावधी सुरू होता.ही बंदी पावसाळ्यातील दोन महिन्यांसाठी असते. गेल्या काही दिवसांत अनेक मच्छीमारांनी मासळी मिळत नसल्याने नौका किनाऱ्यावर ओढण्यास सुरुवात केली होती.

कर्नाटक, नेपाळसह विविध राज्यातून आलेले खलाशीही माघारी परतले आहेत. काही मच्छीमारांनी जाळी सुकवून सुरक्षित ठेवली आहेत तर काहींनी रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथे जाळी सुकवण्यासाठी ठेवली आहेत. नौकांची तात्पुरती डागडुजीही केली आहे. मिरकरवाडा बंदरात पाचशेहून अधिक नौका उभ्या करून ठेवल्या आहेत. पावसाळ्यात वादळवारे याचा धोका असल्यामुळे नौका सुरक्षित लावलेल्या आहेत. पांढरा समुद्र येथे यांत्रिकी नौका क्रेनच्या साह्याने किनाऱ्यावर आणलेल्या आहेत. त्यावर प्लास्टिक कव्हर टाकले आहे. मान्सून लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आकाशही निरभ्र असून,समुद्र खवळलेला नाही. त्यामुळे बंदी मोडून मच्छीमारी सुरू राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन मत्स्य विभागाने २७ केंद्रांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी क्षेत्रीय परवाना अधिकारी, सुरक्षादलाचे कर्मचारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular