27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriवाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग स्पर्धेत सातारा येथील संतोष यादव यांनी वाघळी मासा पकडून प्रथम क्रमाकांचे पारितोषिक पटकावले. त्याचा आकर्षक चषक, रोख ५० हजार रुपये, रॉड आणि रिळ देऊन गौरव करण्यात आला. रविवारी (ता. २८) भाट्ये किनारी रंगलेल्या या स्पर्धेत ११० जणांनी सहभाग घेतला होता. कोकणातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, या दृष्टिकोनातून पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी फिशर्स क्लबने आयोजित केलेल्या ओपन सर्फ फिशिंग क टुर्नामेंट रविवारी भाट्ये किनाऱ्यावर पार पडली. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत अनेकांनी भाग घेतला होता. भाट्ये बीचवर रविवारी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक संतोष यादव (सातारा) यांनी मिळवले. त्यांनी वाघळी मासा पकडला. त्यांना आकर्षक चषक, रोख रु. ५० हजार सोबत रॉड आणि रिळ देऊन गौरवण्यात आले. द्वितीय पारितोषिक रत्नागिरीतील सुजित मयेकर यांनी पटकावले. त्यांना ३० हजार रु. रोख आणि सोबत रॉड आणि रिळ देऊन सन्मानित करण्यात आले.

तृतीय पारितोषिक पंकज पुसाळकर (रत्नागिरी) यांनी मिळवले. त्यांना रोख रु. २० हजार, स्मृतिचिन्ह रॉड आणि रिळ देऊन गौरवण्यात आले. चौथे पारितोषिक महंमद अली यांनी पटकावले. त्यांनाही गौरवण्यात आले. याशिवाय अन्य बक्षिसांमध्ये फर्स्ट कॅच मयूर बंडबे, लास्ट कॅच सूरज बावणे, मोअर कॅच महेश तळवणेकर, युनिक कॅच लालजी कांजी सोलंकी, गेस्ट अँगल सोहम प्रशांत सावंत, फिमेल अँगलर श्रेया परेश भागवत यांनाही बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरणाला उद्योजक किरण सामंत, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय साळवी, भाट्ये सरपंच प्रीती भाटकर, माजी सरपंच पराग भाटकर, राजेश पाटील, सुमेधा भाटकर, रमिझा भाटकर आदी उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष बांधकाम व्यावसायिक नित्यानंद भुते यांनी सर्वांचे स्वागत केले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी फिशिंग क्लबचे संतोष सावंत, केतन भोंगले, आसिफ मोहम्मद रोहित बिर्जे, डॉ. अभय धुळप तर रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या १० १० सभासदांनी मार्शल्सची भूमिका पार पाडली. स्पर्धकांच्या सेफ्टीसाठी लाईफ जॅकेट व फर्स्टएडची सोय केली होती. या स्पर्धेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, मुंबई, गोवा, गुजरात, दीवदमण, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा, पुणे, सातारा, रायगड, सांगली, कोल्हापूरमधून ११० स्पर्धकांनी सहभागी होत स्पर्धेचा आनंद लुटला. या स्पर्धेत एकूण ११० विविध जातींचे मासे पकडले गेले व त्यांना त्वरित मुक्त करण्यात आले. पुढच्या वर्षी याहीपेक्षा भव्य राष्ट्रीय स्पर्धा रत्नागिरीमध्ये राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून पार पाडू, असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष नित्यानंद भुते यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular