24.2 C
Ratnagiri
Thursday, February 12, 2026

रत्नागिरीतील नाट्यगृह नाकापेक्षा मोती जड

रत्नागिरी पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि चिंताजनक...

ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे मालगुंडमध्ये दिमाखात अनावरण

“ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सुख-दु:खे, संघर्षाची गाथा आणि...
HomeRatnagiriसरी बरसताच चढणीचे मासे पकडण्याची लगबग बांधण बांधण्याची शक्कल

सरी बरसताच चढणीचे मासे पकडण्याची लगबग बांधण बांधण्याची शक्कल

सरी बरसताच चढणीचे मासे पकडण्याची लगबग सड्यांवर सुरू आहे. अधिवास वगैरे शब्द न वापरता जीवनशैली म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे इथली माणसं, प्राणी, पक्षी आणि सर्व घटकांचे निर्माण झालेले सहजीवन. शेती, पाणी आणि खाद्यविषयक अनेक गरजा लिलया भागवणारे सडे पावसाच्या सुरवातीच्या काळात अक्षरशः माणसांनी भरलेले दिसतात. याची अनेक कारणे आहेत. शेतीची कामे, स्वच्छ पाणी, शेवळासारख्या रानभाज्या मिळवण्यासाठी लोकांची सड्यावर झुंबड उडते; रात्री खेकडे आणि मासे पकडण्यासाठीसुद्धा अनेक लोक सड्यावर येतात. या प्रकारच्या पारंपरिक मासेमारीसाठी वेगवेगळ्या पद्धती वर्षानुवर्षे वापरात आहेत त्यातील एक पद्धत म्हणजे बांधण.

याबाबत माहिती देताना वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे म्हणाले, ‘पोटात अंडी असणारे मासे संथ पाण्यात, डोहात अंडी सोडण्यासाठी पाण्याच्या उलट प्रवाहात वरच्या दिशेने प्रवास करतात. यांनाच मळ्याचे मासे अशा नावाने ओळखले जाते. रंगाने काळे असणारे, देखणे दिसणारे, सरळ नेटक्या बांध्याचे हे मासे खायला देखील खूप रुचकर लागतात. हे मासे खूप स्वच्छ असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने पकडले जातात. पाट काढून मासे पकडणे, वरच्या दिशेने बांध घालून पाणी अडवून दुसऱ्या पाटाला पाणी घालवून कमी झालेल्या पाण्यातील मासे एकाने खाली हुसकावत मासे पकडणे, चढणीचे मासे बांधणात पकडणे, नदीला मोठा बांध घालून मध्यभागी लाकडे, वासे टाकून फाडी पाडली जाते, त्याखाली टोके लावतात.

टोक्यात मासे येण्यासाठी बांबूचे सक असतात, त्या सकातून मासे थेट टोक्यात जाऊन पडतात. मोठ्या पावसात मात्र बहुतेक सर्व बांधणे वाहन जातात. बांधणात पकडलेले मासे विकत घेण्यासाठी गर्दी होते. पहिल्या पावसातील हे मासे खरेदी करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते. आदिवासी महिला मासे पकडून त्याच्या विक्रीतून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. बांधण घालण्यासाठी झाडांच्या फांद्या, गवत, पेंढा, बांबू असे घटक वापरले जातात.

RELATED ARTICLES

Most Popular