25.6 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriपावसामुळे सर्वत्र दुरवस्था साखरपा, कोंडगाव रस्त्यावर चिखल

पावसामुळे सर्वत्र दुरवस्था साखरपा, कोंडगाव रस्त्यावर चिखल

मिऱ्या – नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी काम वेगाने सुरू आहे; मात्र साखरपा, कोंडगाव परिसरात ठेकेदार कंपनीने वळण रस्ते काढताना योग्य ती उपाययोजना केलेली नाही. या परिसरात चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने दुचाकीसह छोट्या वाहनांना कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात गांभीर्याने लक्ष देत योग्य ती खबरदारी ठेकेदाराने घ्यावी, अशी मागणी साखरपा ग्रामपंचायतीच्या वतीने संगमेश्वर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी काम वेगाने सुरू असले तरी काही खबरदारी ठेकेदारांनी घेण्याची गरज आहे.

साखरपा, कोंडगाव परिसरात ठेकेदार कंपनीने वळण रस्ते काढताना योग्य ती उपाय योजना केली नसल्याने या परिसरात चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने छोट्या दुचाकी, रिक्षा ही वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिकांसह व्यावसायिक हैराण झाले आहेत. त्यावर उपाय योजना करण्याची जबाबदारी संबधित कंपनीची आहे; दररोज पाऊस पडत असल्याने स्थानिक वाहनचालकांना वाहने चालवताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कंपनीने लक्ष घालून होणाऱ्या त्रासावर मोठा अपघात होण्या अगोदर तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे; परंतु यावर कंपनी लक्ष देत नसल्याने याबाबत प्रशासनाला कळवून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी साखरपा ग्रामपंचायतीने तहसीलदारांना निवेदन दिले आहे. या वेळी सरपंच रूचिता जाधव, उपसरपंच ओंकार कोलते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular