26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeKhedपटसंख्येअभावी दहा वर्षांत ५६ शाळा बंद खेड तालुक्यातील स्थिती...

पटसंख्येअभावी दहा वर्षांत ५६ शाळा बंद खेड तालुक्यातील स्थिती…

खेड तालुक्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. प्रशासनाला पालकांसह लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शिक्षण विभागाकडून ही सारी कसरत करूनही गेल्या १० वर्षांत पटसंख्येअभावी खेड तालुक्यातील तब्बल ५६ शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावरती आली आहे. शिक्षक पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असूनही शासनाकडून शिक्षक भरती केली गेलेली नाही. त्याचाही फटका शिक्षकांची रिक्त पदे असे असण्याला कारणीभूत असल्याचे चित्र आहे. खेड तालुक्यात १० वर्षांत पटसंख्येअभावी बंद झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा माणी मधलीवाडी, निळीक मोहल्ला उर्दू, शिव बुद्रुक उर्दू, लोटे परशुराम, केळणे धनगरवाडी, कुंभाड कुंभारवाडी, तिसंगी उर्दू, धामणंद मुलांडा, कुरवळ जावळी गावठाण, कुरवळ खेड मिरकट बंगाल, सुकवली गवळीवाडी.

भिलारे आयनी, जामगे सीमावाडी, पोयनार अलाटी, पोयनार झेंडे, रजवेल उर्दू, शिरशी उर्दू, चोरवणे, केळणे गवळवाडी, गुणदे मठवाडी, गुणदे देऊळवाडी, कुळवंडी वडाचीवाडी, कुळवंडी जांभूळवाडी, तिसंगी रांगलेवाडी, घेरारसाळगड भराडे, वरवली धनगरवाडा, कळंबणी दंडवाडी, कर्जी रहिमत ऊर्दू, देवघर बौद्धवाडी, दहिवली क्र. १, किंजळेतर्फे नातू कळकरवाडी, तळे म्हसोबावाडी, तिसंगी पिंपळवाडी, घेरा रसाळगड पिंपळवाडी, घेरा रसाळगड पेठतांबड, घेरापालगड राणीमाची, कांदोशी क्र. १, बिरमणी, वडगाव बुद्रुक, सोंडे, घेरा रसाळगड निमणी, आंबये मांजरेकरवाडी, हुंबरी खालचीवाडी, तिसंगी खांडेकरवाडी, फुरूस बौद्धवाडी, तळे चिंचवाडी, पोयनार राववाडी, कुंभवली, शिरगाव बाग, बहिरवली उर्दू क्र. २, घेरा पालगड क्र. २, कशेडी खोतवाडी, मोरवंडे मोदगेवाडी, निगडे बारकोंबडा, तिसंगी धनगरवाडा, सोनगाव घागवाडी या शाळा गेल्या १० वर्षांत पटसंख्येअभावी बंद केल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular