28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

रत्नागिरीमध्ये परिवर्तन घडवायचेच या उद्देशाने माने-महाडिक-बनेंमध्ये बंद दाराआड चर्चा?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून रत्नागिरी-संगमेश्वर...

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...
HomeRatnagiriनरेंद्राचार्य संस्थानच्या ४२ रुग्णवाहिका कार्यरत महामार्गावर २४ तास सेवा...

नरेंद्राचार्य संस्थानच्या ४२ रुग्णवाहिका कार्यरत महामार्गावर २४ तास सेवा…

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे गुरुपौर्णिमेदिवशी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे आता राज्यात ठिकठीकाणी ४२ रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या सेवाकार्यात २४ तास कार्यरत आहेत. संस्थानतर्फे समृद्धी महामार्गावर अशी रुग्णवाहिका ठेवावी, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. गुरूपौर्णिमेला नाणीज येथे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व प. पु. कानिफनाथ महाराज यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

महामार्गावरील अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरू व्हावेत म्हणून संस्थानने २५ जुलै २०१० ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. त्याला १३ वर्षे झाली आहेत. राज्यातील सर्व महामार्गावर संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्या तातडीने अपघातस्थळी जाऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवतात. ही सेवा पूर्ण मोफत आहे. त्यातून गेल्या १३ वर्षांत १९ हजारांवर जखमींचे प्राण वाचले आहेत. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन आणखी ५ रुग्णवाहिकांचे आज लोकार्पण झाले.

या वेळी एका व्हॅनिटी व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. ही व्हॅन भाविकांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांना भेट दिली होती. त्यांना प्रवचन, दर्शन सोहळ्यासाठी जाण्यास सोईचे व्हावे या हेतूने देण्यात आली होती. महाराजांनी ती स्वीकारली व लगेच तिथे त्यांनी दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या पॉझिटिव्ह सोल फाउंडेशनला ही व्हॅन संस्थांनतर्फे भेट दिली. माझ्यापेक्षा या संस्थेला त्याची अधिक गरज असल्याचे महाराजांनी सांगितले. सूत्रसंचालन श्रद्धा बोडेकर यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular