रेल्वेची आरक्षणे अचानक अवघ्या काही मिनिटात फुल कशी होतात याविषयी शंका उपस्थित केल्या जात असतानाच येथील रेल्वे बुकिंग करणाऱ्या एका एजन्सीच्या कार्यालयावर छापा टाकत रेल्वे पोलिसांनी तपासणी केली असता १५ तिकटे अवैध आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेऊन येथील न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यांनंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर जामीनवर मुक्तता केली. सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी संकुलातील गाळ्यात मडगाव रेल्वे पोलिसांनी काल बुधवारी तपासणी करून अक्षय देशपांडे याला ताब्यात घेतले. मडगाव रेल्वे पोलिस विनोद मिश्रा यांनी तत्पूर्वी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना तिकीट काळाबाजार रोखण्यासाठी सावंतवाडी मध्ये कारवाई करणार असल्याचे इन्फम केले होते.
याबाबत कणकवली रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांनंतर अँड पी डी देसाई यांनी न्यायालयात जामीन करण्यासाठी अर्ज केला असता २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. अक्षय देशपांडे याची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. रेल्वे पोलिस निरीक्षक राजेश सुरवळे, युवराज पाटील यांच्या पथकाने सावंतवाडी न्यायालयात अक्षय देशपांडे याला हजर केले. त्याला जामीन मंजूर केला. रेल्वे तिकीट काढण्यासाठी फेक अकाउंट करून तिकीट बुकिंग केली त्यातील १५ तिकीटे अवैध होती असे समोर आले. रेल्वे तिकीट काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.