25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriचिपळूण-संगमेश्वरमधून रोहन बनेंना उमेदवारी ? साळवी राजापुरातूनच लढणार, रत्नागिरीतून कोण?

चिपळूण-संगमेश्वरमधून रोहन बनेंना उमेदवारी ? साळवी राजापुरातूनच लढणार, रत्नागिरीतून कोण?

बालेकिल्ला असलेल्या कोकणात आता ठाकरे गटाने चाचपणी सुरु केली आहे.

विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर आता हालचालीदेखील वाढताना दिसत आहत. बालेकिल्ला असलेल्या कोकणात आता ठाकरे गटाने चाचपणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) जि.प.चे माजी अध्यक्ष रोहन बने यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या रोहन बने यांना पक्षाने कामाला लागा असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शांत आणि संयमी अशी ओळख रोहन बने यांची आहे. त्यामुळे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात रोहन बनेंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. रोहन बने हे माजी आमदार सुभाष बने यांचे ज्येष्ठ पुत्र देखील आहेत. शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्हाभरात राहिलेला चांगला संपर्क, अध्यक्षपदाचा कारकिर्दीत घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय, तसेच तरूण आणि वादात नसलेलं व्यक्तिमत्व म्हणून रोहन बने यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळेच रोहन बने यांना चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यास मोठी अडचण येणार नाही, असं रत्नागिरी जिल्ह्यातील जाणकारांचं म्हणणं आहे.

भास्कर जाधव रत्नागिरीतून? – त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव देखील उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी- संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तयार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा आपली इच्छा बोलून दाखवली आहे. दरम्यान, त्याचवेळी ते आपला मुलगा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासाठी गुहागर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील असल्याचं देखील चर्चिले जात आहे.

चिपळुणातून कोण? – दरम्यान, भास्कर जाधव हे चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं देखील जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पण, पक्ष याबाबत किती गंभीर आहे? याबाबत मात्र शंका आहे. चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून रोहन बने यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने भास्कर जाधव यांना उमेदवारी मिळेल. का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. पण, चिपळूणमधून आगामी विधानसभा लढण्याबाबत अद्याप तरी भास्कर जाधव यांनी उघडपणे आपले मत व्यक्त केलेले नाही.

साळवी राजापूरमधूनच ? – दरम्यान, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ना. उदय सामंत यांच्याविरोधात आ.राजन साळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. आ. राजन साळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लागलेले बॅनर देखील चर्चेचा विषय ठरला होता. पण, साधारणपणे दहा दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या रत्नागिरी शहरातील मेळाव्यामध्ये खासदार विनायक राऊत यांनी राजापूर-लांजा- साखरपा याच मतदारसंघातून आ. राजन साळवींना उमेदवारी देणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता ना. उदय सामंत यांच्याविरोधात नेमका उमेदवार कोण? याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. अशावेळी आ. भास्कर जाधव यांनी केलेलं वक्तव्य देखील महत्त्वाचे आहे. पण, सारी गणितं आगामी काळातील बदलत्या राजकारणावर अवलंबून असणार हे नक्की!

RELATED ARTICLES

Most Popular