28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriमहामार्गाच्या सिंगल लेनचे काम पूर्ण होणार का?

महामार्गाच्या सिंगल लेनचे काम पूर्ण होणार का?

रत्नागिरीतील ९१ किमीचा टप्पा अद्याप रखडलेलाच.

कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे सिंगल लेनचे काम गणपतीपूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे गेले काही महिने सातत्याने प्रयत्नशील आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता दोन टप्प्यातील ९१ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सुमारे ९ वर्षांपूर्वी चौपदरीकरणाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले होते. यावेळी दोन वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र ९ वर्षांनंतरही या कामाची पूर्तता झालेली नाही. आवर्षभरापूर्वी राज्याचे बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारला.

त्यानंतर गेले काही महिने सातत्याने ते या मार्गाच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी इंदापूरपासून थेट सिंधुदुर्गपर्यंत या मार्गाची पाहणी केली. या मार्गातील कामातील अडथळे दूर करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता संगमेश्वरमधील आरवली ते कांट्ये आणि कांट्ये ते वाकेड या मार्गातील अडचणी सुटता सुटत नसल्याने या दोन टप्प्यात मिळून ९१ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण अद्यापक पूर्णत्वास गेलेले नाही. दरम्यान, येथील कामातील सिमेंटची अडचण आता दूर झाली आहे. ठेकेदाराला बिलाच्या रकमाही काही प्रमाणात मिळाल्या आहेत. यामुळे येत्या काही दिवसात बऱ्यापैकी कामाची पूर्तता होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular