24.5 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriपनवेल ते राजापूरपर्यंत मनसेचे आंदोलन, १४ कार्यकर्त्यांना अटक

पनवेल ते राजापूरपर्यंत मनसेचे आंदोलन, १४ कार्यकर्त्यांना अटक

या तोडफोड प्रकरणात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी २ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी मनसेच्या २ नेत्यांना आणि १२ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तर जिल्हाभरात खबरदारीचा उपाय म्हणून ९७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

राज ठाकरेंचा हिरवा झेंडा – मनसेच्या पनवेल येथील मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवताच जिल्ह्यात मनसेच्या खळखट्याकला जोरदार सुरूवात झाली आहे. गुरूवारी राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल प्लाझापाठोपाठ खानू येथील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराच्या कार्यालयावर चाल करीत जमावाने कार्यालयाची तोडफोड केली आहे. रात्री कार्यालयाची तोडफोड झाली तर सकाळी पुन्हा महामार्गावर जावून जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली असून ग्रामीण पोलीस स्थानकात वेगवेगळे २ गुन्हे दाखल झाले आहेत.

१७ वर्षे रखडलेले काम – मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दूरावस्था आणि त्यातच १७ वर्षे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले आहे. नुकताच पनवेल येथे निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात मी तुम्हाला हिरवा झेंडा दाखवायला आलोय अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आणि दोन दिवसांनी रत्नागिरी जिल्ह्यात मनसेच्या खळखट्ट्याकला सुरूवात झाली.

राजापुरातून सुरूवात – महामार्गाची झालेली दूरावस्था या विरोधात मनसेने रणशिंग फुंकल्यानंतर राजापुरात त्याचे संतप्त पडसाद उमटले. राजापूर- हातिवले येथील टोल प्लाझा लक्ष्य केला. आक्रमक झालेल्या लोकांनी हातात लाकडी दांडे घेऊन या टोलनाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.

कार्यालयाची तोडफोड – एकीकडे हातिवले टोल प्लाझाची तोडफोड होत असताना दुसरीकडे रत्नागिरी तालुक्यातील पाली-खानू परिसरात महामार्गाचा ठेका घेतलेल्या. हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कार्यालय लक्ष्य केले. या कार्यालयाची तोडफोड झाली आहे. दरम्यान, आंदोलन करणाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सगळीकडेच खळखट्याक – राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल प्लाझा त्यापाठोपाठ पाली- खानू परिसरातील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. कोकणात रायगडपासून खळखट्ट्याकला सुरूवात झाली. चेतक, सनी, हॅन आदी ठेकेदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

शुक्रवारी जेसीबी फोडला – गुरूवारी रात्री हातिवले आणि खानू येथे तोडफोड झाली. त्यानंतर शुक्रवारी आक्रमक झालेल्या लोकांनी आपला मोर्चा पुन्हा महामार्गाकडे वळविला. पाली येथे सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी जावून एका जेसीबीची तोडफोड करण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मनसेने खळखट्टयाक आंदोलनाला सुरूवात केली आहे.

धरपकड सुरू – मनसेच्या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. आंदोनलकर्त्या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

२ गुन्हे दाखल – या तोडफोड प्रकरणात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी २ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या गुन्ह्यात खानू येथील हॅन इन्फ्रा सोल्युशन प्रा. लि. या कार्यालयाच्या आवारात अनधिकृतपणे प्रवेश करत ऑफिस कंटेनर तसेच सिक्युरिटी केबीनच्या खिडकीचे रॉड वापरून लोखंडी रॉडने केबीनची तोडफोड करून १ लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी ५ संशयितांविरोधात भा.दं.वि.क. १४१, १४३, १४९, ४२७, ४५२, ४४७, मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) क्रिमिनल ॲमेन्डमेंट अॅक्ट कलम ७, सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी ७ जणांवर गुन्हा – खानू येथील कार्यालय फोडल्यानंतर पाली येथे रस्त्याचे काम करत असलेल्या ठिकाणी जेसीबीची तोडफोड करून सुमारे १ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान केले आहे. तसेच त्यातील तक्रारदार नितीन कृष्णा पवार यांचा मोबाईल फोडल्याप्रकरणी ७ संशयितांविरोधात भा.दं.वि.क. १४१, १४३, १४९, ४२७, ३४१, मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) क्रिमिनल ॲमेन्डमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंभीर दखल – या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालत गंभीर दखल घेतली आहे. दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक मारूती जगताप, परिविक्षाधिन पो. उपअधीक्षक संग्राम पाटील आदींनी ग्रामीण पोलीस स्थानकात ठाण मांडले होते.

१४ जणांवर गुन्हे दाखल – याप्रकरणात ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १४ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रूपेश श्रीकांत चव्हाण, राजू शंकर पाचकुडे, विशाल चव्हाण, अजिंक्य केसरकर, कौस्तुभ केळकर, सुशांत घडशी, मनिष पाथरे, सुनील राजाराम साळवी, महेश दत्ताराम घाणेकर, महेश गणपत घाणेकर, रूपेश मोहन जाधव आदींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना १९ ऑगस्टला न्यायालयात हजर केले जाईल असे पोलिसांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular