24.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeKhedबेघर पोसरेवासीयांचा प्रश्न सहा महिन्यांत निकाली...

बेघर पोसरेवासीयांचा प्रश्न सहा महिन्यांत निकाली…

या घटनेला तब्बल २ वर्षांचा कालावधी लोटूनदेखील ठोस उपाययोजना केली गेली नव्हती .

तालुक्यातील पोसरे येथील दरडग्रस्त नागरिकांना आगामी सहा महिन्यात तालुक्यातील असगणी येथे पुनर्वसन होऊन त्यांना हक्काची घरे मिळतील. यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे लेखी पत्र येथील खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाला देण्यात आल्याने लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले. पोसरे येथे २२ जुलै २०२१ ला दरड कोसळून ९ घरांतील १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेला तब्बल २ वर्षांचा कालावधी लोटूनदेखील ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने आपद्ग्रस्त अलोरे चिपळूण या ठिकाणी वंचिताचे जीवन जगत आहेत. खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाने प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालय यांच्याकडे निवेदन दिले होते.

मात्र, त्यानंतरही कोणतीच उपाययोजना न केली गेल्याने तहसील कार्यालयांच्या आवारात उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी येथील तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सोनावणे यांची भूमिका न पटल्याने त्यांनी आणलेले पत्र त्यांना परत देण्यात आले. यानंतर प्रांताधिकारी राजश्री मोरे यांनी भेट घेतली. या वेळी तालुकाध्यक्ष राजरत्न तांबे, सरचिटणीस संदीप तांबे, सुधीर जाधव, वीरसेन मोरे आदी पदाधिकारी यांनी दरडग्रस्तांची व्यथा मांडत मागासवर्गीय असल्यामुळे अन्याय करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

याबाबतचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवण्यात आला असून आगामी सहा महिन्यात अंमलबजावणी करून खेड तालुक्यातील असगणी येथे हक्काची घरे उभी करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर ३० ऑगस्टला प्रांत कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याने उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular