22.7 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriरत्नागिरीत नळपाणी योजनेच्या हायड्रोलिक टेस्टींगवेळी पाईप लाईन फुटली

रत्नागिरीत नळपाणी योजनेच्या हायड्रोलिक टेस्टींगवेळी पाईप लाईन फुटली

रत्नागिरी शहरासाठी सुमारे ६३ कोटी रुपये खर्च करुन नवीन नळपाणी योजना राबवण्यात आली.

शहरातील नवीन पाणी योजनेची पाईप लाईन सोमवारी करण्यांत आलेल्या हायड्रोलिक टेस्टींगमध्ये यशस्वी ठरली नाही. टेस्टींग सुरु असताना बांधकाम विभागासमोर ही पाईप लाईन पुन्हा फुटली. त्यामुळे नगर पालिकेकडून याबाबतचा अहवाल जीवन प्राधिकरणकडे पाठवण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरासाठी सुमारे ६३ कोटी रुपये खर्च करुन नवीन नळपाणी योजना राबवण्यात आली. ही नळपाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. मात्र ही योजना सुरु झाल्यापासून पाण्याच्या दबावाने ती सातत्याने फुटत आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाऊन पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत असतो.

त्यामुळे या पाणी योजनेचे हायड्रोलिक टेस्टींग व्हावे अशी सातत्याने मागणी करण्यात येत होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पण नुकताच या योजनेचे हायड्रोलिक टेस्टींग करण्याचा निर्णय घेण्यात आला. टेस्टींग सुरु झाल्यानंतर २४ तास त्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याने जेल नाका ते गोडीबाव हा सुमारे एक किलोमीटर पाईपलाईनचा परिसर निवड आला होता. याच भागात वारंवार पाईप लाईन फुटण्याचे प्रकार घडले होते. जेलनाका ते गोडीबावपर्यंत हायड्रोलिक टेस्टींग पूर्ण झाले आहे. यामुळे मंगळवारी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे नगर पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाईपलाईन फुटली – सोमवारी सकाळी हायड्रोलिक टेस्टींग करण्यात आले. यासाठी पाईपलाईनचे प्रेशर तपासण्यात आले. त्यानंतर प्रेशर वाढवून तपासणी करण्यात आली त्यात बांधकाम विभागासमोर पाईप लाईन फुटली. यावेळी ठेकेदार कंपनीचे अधिकारी, नगर परिषद अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या भागातील हायड्रोलिक टेस्टींगचा अहवाल जीवन प्राधिकरणाकडे पाठविला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular