26.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriएसटीचा रत्नागिरी-मुंबई प्रवास ५० रुपयांनी महागला

एसटीचा रत्नागिरी-मुंबई प्रवास ५० रुपयांनी महागला

रत्नागिरीवरुन मुंबईला जाण्यासाठी ५२५ रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता ५७५ रुपये मोजावे लागणार आहेत.

दिवाळीच्या मुहूतांवर कोकणात जाणाऱ्यांना यंदा भाडेवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण की, एसटी महामंडळाने सणासुदीमुळे हंगामी भाडेवाढ केली आहे. महामंडळाकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंगळवार रात्रीपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आले आहे. यामुळे आता रत्नागिरी ते मुंबई दरम्यानचा प्रवास ५० रुपयांनी महागला आहे. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सने भाड्यात दुपट्टीने वाढ केली असताना दुसरीकडे एसटी महामंडळाने देखील प्रवाशांना हा मोठा फटका दिला आहे.

सध्या दिवाळीसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली आहे. अशातच रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे, आता प्रवाशांना फक्त एसटी महामंडळाचा पर्याय उपलब्ध आहे. खासगी ट्रॅव्हल्स देखील प्रवाशांकडून जास्त पैसे आकारत आहेत. त्यामुळे परिवहन महामंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार, आहे. आता रत्नागिरी-मुंबई प्रवास ५० रुपयांनी महागला आहे. यापूर्वी रत्नागिरीवरुन मुंबईला जाण्यासाठी ५२५ रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता ५७५ रुपये मोजावे लागणार आहेत.

यासोबत इतर ठिकाणी जाण्यासाठी देखील अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीने ७ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत १० टक्के ही हंगामी दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका पर्यटकांना बसणार आहे. मुख्य म्हणजे, या दरवाढीमुळे प्रवाशांनी जर खाजगी ट्रॅव्हल्स विचार केला तर त्यांना यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता नाईलाजाने का होईना प्रवाशांना एस टी महामंडळाचाच पर्याय निवडावा लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular