शहराजवळील साळवी स्टॉप ते मिऱ्याबंदर जाणाऱ्या रस्त्यावर चंपक मैदान येथे व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या उद्देशाना आलेल्या मालवण, देवगड येथील ४ संशयित आरोपी पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून १८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध वन्य जीव (संरक्षण) अधिनियामद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास अनंत मेस्त्री (वय ४८, रा. जामसंडे, तरवाडी ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग), समिर विठ्ठल तेली (वय ३९, रा. बगाडवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), राजेश मोतीराम जगताप (वय ३४, रा. साईनाथवाडी देवगड, जि. सिंधुदुर्ग) महेश मनोहर ठुकरूल (वय ४८, रा. टाटा पॉवर श्रीकृपा चाळ कमिटी, देवीपाडा, बोरीवली मुंबई, मुळ जामसंडे, मळी ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) अशी संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
ही घटना सोमवारी (ता. ६) रात्री ८ वा. च्या सुमारास साळवी स्टॉप ते मिऱ्याबंदर जाणाऱ्या रस्त्यावरील सपकाळ (वय ७०) हे आपल्या घरात एकटेच राहत होते. वयोवृद्ध झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. याच अवस्थेत बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुरु असून यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत. शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातूनही अवैध व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहर परिसरात पोलिस गस्त घालत असताना पोलिसांना ४ संशयित सापडले.
त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे व्हेल माशाची उलटीसहीत १ हजार किमतीचा बेसिक मोबाईल फोन, १ हजार ९२० रुपयांची रोख रक्कम, ५ हजाराचा मोबाईल, दुसरा ५ हजाराचा मोबाईल असा १८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी तो जप्त केला. या प्रकरणी पोलिस अधिक्षक कार्यालयातील सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस फौजदार प्रशांत बोरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४९, (ब) ५७, ५१ अन्वेय गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.