29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunवाशिष्ठीतील गाळ उपसा सुरूच राहणार - पालकमंत्री उदय सामंत

वाशिष्ठीतील गाळ उपसा सुरूच राहणार – पालकमंत्री उदय सामंत

वाशिष्टी नदीचे गाळ काढण्याचे काम थांबणार नाही.

यंदा वाशिष्ठी नदीमध्ये सुरू झालेला गाळ उपसा कोणत्याही परिस्थितित यापुढे थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे चिपळूणकरांना दिला. चिपळूण येथील उक्ताड जुवाड येथे वाशिष्टी नदी टप्पा क्र १ मधील गाळ काढण्याचा शुभारंभ पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते म्हणाले की, दिवाळीमध्ये चिपळूणकरांना दिवाळी भेट द्यावी, यासाठी गाळ उपसा कामाचा दिवाळीमध्ये आरंभ करण्यात आला आहे. गाळ काढणे हे आपल्या सर्वांचे प्राधान्य आहे.  चिपळूणकरांची अडचण दूर करण्यासाठी त्यांना नदीला येणाऱ्या पुरापासून भयमुक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत.

वाशिष्टी नदीचे गाळ काढण्याचे काम थांबणार नाही. येथील नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आमदार शेखर निकम यांनी वाशिष्ठी नदीतील गाळ उपशासह नदी संवर्धनासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे सांगतनदीतील गाळ उपशासाठी आवश्यक तो निधी तत्काळ मिळावा अशी मागणी केली. या वेळी सदानंद चव्हाण, रमेश कदम, प्रशांत यादव, सुरेखा खेराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, गणेश सलगर, बापूसाहेब काणे, राजेश वाजे, समीर जानवलकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular