28 C
Ratnagiri
Friday, June 13, 2025

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला...

शिक्षकांना प्रशिक्षणात अपमानास्पद वागणूक – संभाजी थोरात

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्रथमच...

कृषी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून फसवणूक

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या...
HomeRatnagiriगणपतीपुळे समुद्रकिनारा फसला व्हेल मासा, राबले शेकडो हात

गणपतीपुळे समुद्रकिनारा फसला व्हेल मासा, राबले शेकडो हात

पाण्यात गेल्यानंतर वॉटर स्पोर्टस्वाल्यांच्या बोटीने त्याला खोल पाण्यात नेण्यासाठी कसरत सुरू होती.

तालुक्यातील गणपतीपुळे किनारी लागलेल्या ३० फुटी व्हेल माशाच्या पिल्लाला खोल समुद्रात सोडण्यासाठी स्थानिकांसह प्रशासन सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न करत होते. व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामस्थांची कसरत सुरू होती. कापडामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता. भरती सुरू झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत दोन जेसीबी आणि एका बोटींच्या साह्याने व्हेलला खोल पाण्यात नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ३० ते ३५ फूट लांबीचा व्हेल मासा आढळला. भला मोठा मासा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह पर्यटकांनीही गर्दी केली होती. ही माहिती वन विभागाला कळविण्या आली.

सकाळी भरतीला किनाऱ्यावर पाणी असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, किनाऱ्यावरील व्यापारी, वॉटर स्पोर्टस् संस्था, एमटीडीसीमधील कर्मचारी यांनी त्या माशाला खोल समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला; परंतु लाटांमुळे व्हेल मासा पुन्हा समुद्रकिनारी वाहत आला. ओहोटी सुरू झाल्यानंतर मासा वाळूवर आला होता. त्याला पाणी मिळावे म्हणून जेसीबी आणून खणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी याची माहिती मत्स्यविभागालाही कळविली होती. दुपारी उन्हाचा कडाका असल्यामुळे व्हेलला त्याचा त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

त्या माशाच्या सुरक्षिततेसाठी त्याला कापडामध्ये गुंडाळले. त्याच्या अंगावर पाणी ओतले. बादल्या भरून ग्रामस्थ हे काम करत होते. भरती सुरू झाल्यानंतर पाणी हळूहळू किनाऱ्याकडे येऊ लागले. लाटांनाही जोर होता. दोन जेसीबीच्या मदतीने व्हेल माशाला पाण्याच्या दिशेने ढकलण्यात आले. पाण्यात गेल्यानंतर वॉटर स्पोर्टस्वाल्यांच्या बोटीने त्याला खोल पाण्यात नेण्यासाठी कसरत सुरू होती. व्हेलला दोरीच्या साह्याने व्यवस्थित दोन्ही बाजूने बांधून ठेवले होते. यासाठी मत्स्य विभागाची नौकाही मागविण्यात आली होती.

हे रेस्क्यू गणपतीपुळे एमीडीसीचे कर्मचारी, ग्रामपंचायत गणपतीपुळेचे जीवरक्षक आणि कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी, गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्र कर्मचारी, मेरिटाईम बोर्ड कर्मचारी आणि गणपतीपुळे वॉटर स्पोर्टस्, किनाऱ्यावरील व्यावसायिक, देवस्थानचे कर्मचारी यांच्या सहकार्याने सुरू होते. दरम्यान, व्हेल माशाला पाहण्यासाठी ग्रामस्थांसह पर्यटकांनी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular