26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeKhedलोटेतील कोकाकोला प्रकल्पाचे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

लोटेतील कोकाकोला प्रकल्पाचे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

या प्रकल्पासाठी १०० एकर जागेची मागणी करण्यात आली असताना सध्या एमआयडीसीने ४७ एकरवर ताबा दिला आहे.

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत असगणीच्या विस्तारित क्षेत्रातील ४७ एकरच्या माळरानावर कोकाकोला प्रकल्प उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नोव्हेंबर महिनाअखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपजून करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार एमआयडीसीने रस्ते बांधणीसह विविध कामे हाती घेतली आहेत.पाच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्यात कोकणच्या औद्योगिक विकासाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडताना शीतपेय बनवणाऱ्या कोकाकोला कंपनीबरोबरच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

सुमारे हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पातून ज्यूस, बाटलीबंद पाणी व शीतपेय यांचे उत्पादन घेतले जाणार असल्याचे त्यावेळी जाहीर करतानाच या प्रकल्पातून ५०० हून अधिकजणांना रोजगार उपलब्ध होईल, असे सांगण्यात न आले होते. राज्यातील हा चौथा प्रकल्प 7 असल्याने कोकाकोला प्रकल्पाच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकवेळा या औद्योगिक वसाहतीत येऊन पाहणी करत परिसरातील हवा, पाणी, मातीचे नमुने घेतले होते.

१०० एकर जागेची गरज – या प्रकल्पासाठी १०० एकर जागेची मागणी करण्यात आली असताना सध्या एमआयडीसीने ४७ एकरवर ताबा दिला आहे. लागणारी अधिकची जागा देण्याची तयारीही दर्शवली आहे. सद्यस्थितीत प्रकल्प जागेतून तेथील ग्रामस्थांच्या रस्त्याचा असलेला प्रश्नही निकालात काढला गेला आहे. गेल्यावर्षी प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात ८ फुट उंचीची आणि २ कि.मी. लांबीची जांभा दगडाची भिंतीची उभारणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन – दरम्यान, प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते करण्याच्या दृष्टीने उद्योगमंत्री सामंत हे तयारीला लागले आहेत. त्यांच्या पाली येथील निवासस्थानी एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये महत्वपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सध्या या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. शक्यतो २१ नोव्हेंबरला भूमिपूजनाची तारीख निश्चित होत असल्याची माहिती हाती येते आहे. मात्र अधिकृतपणे तारीख जाहीर झालेली नाही. रस्त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने या दौऱ्यात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. मात्र नोव्हेंबर अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular