25.8 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunचिपळुणात सामान्यांना मिळेना काळं सोनं

चिपळुणात सामान्यांना मिळेना काळं सोनं

प्रतिब्रास ६०० व ५ टक्के जीएसटी एवढी रक्कम भरून ऑनलाईन बुकिंग घेतली जाते.

वाळूसाठी सरकारने सुरू केलेली ऑनलाईन प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाळू मिळणे कठीण झाले आहे. कधी वेबसाईट उघडत नाही तर कधी टोकन नंबर मिळत नाही. त्यामुळे टोकन नंबरसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. यामध्ये वाळूचा काळाबाजार सुरू झाला की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ६५० रुपयांची वाळू गाडीभाड्यासह तिप्पट दराने मिळत आहे. यावरून चिपळुणात नाराजी व्यक्त केली जात आहे. नव्या शासकीय धोरणानुसार, चिपळुणात तीन वाळू डेपोला मान्यता मिळाली. त्यातील गोवळकोट धक्का मैदान येथे दोन तर करंबवणे येथे एक अशा तीन डेपोपैकी गोवळकोटचे दोन डेपो सुरू झाले. शासकीय वाळू खरेदीसाठी प्रतिब्रास ६०० व ५ टक्के जीएसटी एवढी रक्कम भरून ऑनलाईन बुकिंग घेतली जाते.

या नव्या डेपोच्या माध्यमातून शासनमान्य मंजूर घरकुलांना दहा ब्रास इतकी मोफत वाळू मिळणार आहे; परंतु सर्वसामान्य नागरिकांना ६५० रुपयांची वाळू मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. सुरवातीचे काही दिवस ऑनलाईन पद्धतीने सरसरकट वाळू मिळत होती. आता वेबसाईट वेळेवर सुरू होत नाही, आयडी मिळत नाही, गाडीचा वजनकाटा बंद पडला आहे, वेबसाईट सुरू झाली तर आठ मिनिटात वाळू संपते आणि वेबसाईट कधी सुरू होईल, हेही सांगता येत नाही. वाळूची गरज असलेल्या नागरिकांना डेपोच्या ठिकाणी वारंवार खेटे मारावे लागत आहेत. या परिस्थितीला कंटाळून काळ्या बाजारात वाळू घेण्यास सुरवात केली आहे.

त्यामुळे दिवसेंदिवस काळ्या बाजारातील वाळूचा भाव वाढत चालला आहे शिवाय शहर हद्दीत गाडीभाड्यात एक हजार रुपयांनी वाढ केली आहे. प्रतिब्रास वाळू अडीच ते साडेतीन हजार रूपये दराने विक्री केली जात आहे. त्यासाठी छोटे-मोठे सक्रिय झाले आहेत. वाळूसाठी काहीही करू नका फक्त पैसे द्या, या पद्धतीने हे एजंट काळ्या बाजारातील वाळूचा प्रचार प्रसार करत आहेत. त्यासाठी काही नागरिकांचे आधारकार्ड मिळवण्याकरिता देखील एजंटमध्ये नवी स्पर्धा सुरू झाली आहे. काहींनी तर नातेवाईकांचे आधारकार्ड मिळवून नवा व्यवसायच सुरू केला आहे. या प्रकाराबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

आयडीसाठी दीडशे रुपये – शासनाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने वाळूचा आयडी काढता येतो. ही प्रक्रिया साधीसोपी असली तरी काही सर्वसामान्य नागरिकांना पुरेशा माहिती अभावी ते शक्य होत नाही. त्याचा फायदा उठवून काही एजंट आयडी काढून देण्यासाठी दीडशे रूपये आकारत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular