25.1 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriशहरातील मुख्य मार्गावर काँक्रिटीकरण

शहरातील मुख्य मार्गावर काँक्रिटीकरण

अवजड वाहनचालकांनी मिऱ्या रत्नागिरी-कोल्हापूर हायवे रोडचा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला प्रारंभ झाला आहे. साळवी स्टॉप येथून या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे साळवी स्टॉपपासून मारुती मंदिरपर्यंत आणि तिथून पुढे मिरकरवाडा येथील दांडा फिशरीज कंपनी रोडचे काम पूर्ण होईपर्यंत एक मार्गिका बंद करण्यात येत आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता या मार्गिकेकवर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज जारी केले. शहरातील साळवी स्टॉप ते मारुती मंदिर आणि दांडा फिशरीज कंपनी या रस्त्याचे एका मार्गिकेचे काम चालू करण्यात आले आहे. या रस्त्यावर वाहतूककोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांनी त्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करून वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.

शहरातील रस्त्यांची वारंवार कामे करावी लागत आहेत. वारंवार पडणारे खड्डे व त्यावर होणारी दुरुस्ती हा खर्चही भरपूर आहे. त्यामुळे हे खड्डे पडू नयेत याकरिता राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काँक्रिटच्या रस्त्यांचा पर्याय सुचवला. त्यांच्या हस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. वाहतूककोंडी होऊ नये याकरिता वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. ते मार्ग पुढीलप्रमाणे-अवजड वाहनचालकांनी मिऱ्या रत्नागिरी-कोल्हापूर हायवे रोडचा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. शहरातील वाहनचालकांनी मारुती मंदिर, नाचणे, पोमेंडी रोड या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. मारुती मंदिर, रत्नागिरी, मजगांव, मिरजोळे रोड या पर्यायी तसेच शिरगाव, परटवणे, भाट्ये, पावस सागरीमार्गाचाही अवलंब करावा.

RELATED ARTICLES

Most Popular