21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeKhedखेडमध्ये पुन्हा सापडला गुटखा वाहतूक करणाऱ्याला अटक

खेडमध्ये पुन्हा सापडला गुटखा वाहतूक करणाऱ्याला अटक

टेम्पोसह एकूण ७ लाख १५ हजार ५२० रुपयांचा माल जप्त केला आहे.

खेड तालुक्यातील चिरणीफाटा येथे गुटख्याची वाहतूक रोखत पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून टेम्पोसह एकूण ७ लाख १५ हजार ५२० रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी संतोष कुण्णा कासार (४२, रा. मालघर, ता. चिपळूण) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यावर भा. दं. वि. सं. कलम २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १:५५ च्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी संतोष कृष्णा कासार हा आपल्या ताब्यातील टेम्पो घेवून निघाला होता.

संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी गाडी रोखली आणि तपासणी केली असता टेम्पोमध्ये गुटखा सापडला. यामध्ये १३,०६८/- रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला चॉकलेटी रंगाचे प्रत्येक पॅकेट रूपये १९८/- रुपयाचे ६६ नग, १४५२/-रुपये किमतीचे व्ही १ टोबॅको चॉकलेटी रंगाचे रंगाचे ६६ नग पॅकेट, ९४०/- रुपये किंम तीचे केसर मुक्त विमल पान मसाला चॉकलेटी रंगाचे प्रत्येकी ४७ रुपये किंमतीचे १० नगाचे २ बॉक्स, ६० – रूपये किंमतीचे १ बिग व्ही १ टोबॅको चॉकलेटी रंगाचा १० नगाचा बॉक्स असा एकूण १५,५२०/- रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular